Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2021 | 08:34 PM
कोल्हापूरच्या प्रवेशद्वारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक आज लावण्यात आला.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर एका उद्योगपतीच्या नावाचा फलक झळकत होता. याबाबत समस्त कोल्हापूर वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता दाखवून देण्यासाठी राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करीत नावाचा फलक लावण्यात आला. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या” विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

राजेश क्षीरसागर म्हणाले, इंग्लंडच्या राणी समोर न झुकता आपला स्वाभिमान संपूर्ण जगाला दाखविला. असे असताना कोणी एखादा उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून आपली जाहिरात करत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आम्हा कोल्हापूर वासीयांवर थोर असे उपकार आहेत. त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक असून त्यांच्या विचारांनी प्रेरित होवूनच शिवसेना समतेने सामाजिक कार्यात, जनहिताच्या कामात कार्य करत आहे. परंतु, अशाप्रकारे कोल्हापूरच्या स्वाभिमानाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरचा स्वाभिमान दाखवून देवू, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, रणजीत जाधव, राजू पाटील, सुनील खोत, पानपट्टी सेनेचे अरुण सावंत, किशोर घाटगे, धनाजी दळवी, अश्विन शेळके, निलेश हंकारे, रियाज बागवान, राजू काझी, सनी अतिग्रे, रमेश पोवार, गजानन भुर्के, मंदार तपकिरे, विनय वाणी, सुनील भोसले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, राज भोरी, सुशील भांदिगरे, अंकुश निपाणीकर, युवा सेनेचे योगेश चौगले, विश्वदीप साळोखे, शैलेश साळोखे, दादू शिंदे, केदार वाघापुरकर, टिंकू देशपांडे, अक्षय कुंभार, सागर कलघटकी, विश्वजित चव्हाण, दिनेश साळोखे, राहुल माळी, अक्षय खोत, तन्वीर बेपारी आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Name of rajarshi chhatrapati shahu maharaj at the entrance of kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2021 | 07:19 PM

Topics:  

  • kolhapur
  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj

संबंधित बातम्या

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
1

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
2

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
3

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल
4

Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.