सिंधुदुर्ग : शिवसेना नेते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते आमदार नितेश राणेंना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती. त्यावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे.
भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे.
[read_also content=”मध्य प्रदेशातही हिजाबवर येणार बंदी? एमपीचे शालेय शिक्षणमंत्री म्हणतात हिजाबवरील बंदी योग्यच, प्रथा घरासाठी आहेत, शाळेसाठी नाहीत https://www.navarashtra.com/india/controversy-hijab-to-be-banned-in-madhya-pradesh-too-the-mps-school-education-minister-says-the-ban-on-hijab-is-appropriate-the-practice-is-for-home-not-for-school-nrvb-235159.html”]
नितेश राणे यांना सोमवारी ओरोसवरून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयातील हृदयरोग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक नेमण्यात आलं आहे. काल त्यांच्या काही टेस्ट करण्यात येणार होत्या. परंतु, त्या झाल्या नाहीत. आज या वैद्यकीय टेस्ट होणार होत्या. मात्र, त्यांनी रात्रभरात तीन वेळा उलट्या केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे वैद्यकीय पथक त्यांना तपासून उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नितेश यांना रक्तदाब, छातीत दुखणे आणि मानदुखीचाही त्रास होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.