
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील नणुद्रें येथील आरोपी भूषण शंकर जाधव वय २३ याने एका अल्पवयीन मुलीवर २०२० ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोल्हापुरातील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्ती केले व नग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवू लागला पीडित मुलीले या सगळ्या प्रकाराची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यामुळे आरोपी भूषण जाधव याच्यावर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भूषण जाधव याला अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करून पन्हाळा न्यायालयात हजर केला असता पन्हाळा न्यायालय यांनी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पन्हाळा पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, किशोर पाटील ,विनायक पाटील ,सलीम सनदी ,करीत आहेत