Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना सुपरस्प्रेडर ठरवून पंतप्रधान मोंदीकडून उत्तर भारतींयाचा घोर अपमान : सचिन सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच उत्तर भारतीयांना कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरवून त्यांचा घोर अपमान केला. मुंबई महानगरपालिका व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला या अपमानाची भरपाई करावी लागेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2022 | 04:36 PM
कोरोना सुपरस्प्रेडर ठरवून पंतप्रधान मोंदीकडून उत्तर भारतींयाचा घोर अपमान : सचिन सावंत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी पद्धतीने लॉकडाऊन लावून करोडो लोकांचे हाल केले. कोरोनाच्या गंभीर संकटात मुंबईतील लाखो उत्तर भारतीय नागरिकांना काँग्रेसने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने घरी पाठवले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच उत्तर भारतीयांना कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरवून त्यांचा घोर अपमान केला. मुंबई महानगरपालिका व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला या अपमानाची भरपाई करावी लागेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतील उत्तर भारतीय नेते गप्प का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, दुर्दैवी व आपल्याच देशाच्या नागरिकांचा अपमान करणारे आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर मुंबईतील उत्तर भारतीय नेते गप्प का आहेत? उत्तर भारतीय लोकांबद्दल मोदींच्या मनात किती प्रेम आहे हे या अपमानातून त्यांना दिसले असेलच? या घोर अपमानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसला बदनाम करण्याच्या नादात पंतप्रधान मोदींनी आपल्याचा देशाच्या नागरिकांना बदनाम केले.

मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन

कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा सामना देश करत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपा काढल्या. लहरी व मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन लावून करोडो लोकांना मोठ्या संकटात ढकलले. या संकट काळात काँग्रेस पक्षाने मा. सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार मुंबईतील उत्तर भारतीय बांधवांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली. वाहतुकीची सुविधा नसतानाही रेल्वे, बसच्या माध्यमातून आपल्या राज्यात जाऊ पाहणाऱ्या लाखो परप्रांतीय नागरिकांना काँग्रेसने सुविधा पुरवली व त्यांच्या राज्यात पाठवले.

[read_also content=”मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार https://www.navarashtra.com/latest-news/congress-aggressive-against-modi-congress-workers-will-stage-agitation-in-front-of-bjp-offices-across-the-state-tomorrow-nrdm-234653.html”]

मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती

देशाचे पंतप्रधान या नात्याने संकटकाळात नागरिकांना मदत करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमस्ते करताना किंवा मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊन केला नाही तेव्हा कोरोना पसरला नाही. ट्रेनही काँग्रेसने चालवली?  पियुष गोयल थाळ्या वाजवत होते का?. गुजरातमधून गेलेले मजूर कोरोना पसरवत नव्हते. फक्त महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजूरांनी कोरोना पसरवला का? अशी प्रश्नांची सरबत्ती सावंत यांनी केली. मोदी सरकारने कोट्यवधी कामगारांना वाऱ्यावर सोडले म्हणून काँग्रेसने गरीब कामगारांच्या तिकिटांसाठी पैसे दिले. असहाय्यांना मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही शिवरायांची शिकवण आहे. म्हणून काँग्रेसने केलेल्या कर्तव्य पालनाचा आम्हाला अभिमान आहे असे सावंत म्हणाले. उत्तर भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या अपमान विसरणार नाहीत व त्यांनी केलेल्या अपमानाची सव्याज परतफेड निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून करून देतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title: Prime minister mondi insults north indians by declaring corona a super spreader sachin sawant nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 04:36 PM

Topics:  

  • Congress
  • narendra modi
  • sachin sawant

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.