वाघोली:वाघोली(ता.हवेली) येथील वाघोलीचे माजी पोलीस पाटील तथा माजी उपसरपंच हवेली तालुक्याचे शिवसेनेचे नेते रामकृष्ण सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.जिल्हा नियोजन समितीला साह्य करण्यासाठी नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये शिरूर-हवेलीतुन रामकृष्ण सातव पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असल्याचे सुनिल गर्जे यांनी सांगितले.
रामकृष्ण सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या हस्ते पार पडला.सातव पाटील यांचे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख संजयराव सातव पाटील,पंचायत समितीचे सदस्य नारायण आव्हाळे,केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे,वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिद्र सातव पाटील,पिंटू कटके,सुनील जाधवराव,सुधीर दळवी,सागर गोरे,उद्योजक नटराज सातव पाटील,राहुल सातव पाटील,गणेश गोगावले,सुनील काळे,माजी उपसरपंच मारुती गाडे,श्रीकांत वाघमारे,गणेश पाचारने यांनी अभिनंदन केले.
शिरूर-हवेलीच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते,पाणी,वीज आदी विकासकामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जिल्हा नियोजन समितीचे पद मिळताच आम्ही कामाला लागलो आहोत.जिल्हा नियोजनमध्ये रखडलेल्या विकासकामांचा पाठपुरावा करून सदरील कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.तसेच शिवसेना पक्षाने आमच्या वरती टाकलेला विश्वास व दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडून तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख संजयराव सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली.
[blockquote content=”वाघोली परिसराच्या विकासासाठी गेले अनेक वर्षांपासून पोलीस पाटील असल्यापासून ते वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कार्यकालमध्ये रामकृष्ण सातव पाटील यांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद तसेच पीएमआरडीए,तसेच आदी शासन स्तरावर वाघोली परिसर नव्हे तर हवेली तालुक्यात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे केलेली आहेत.सातव पाटील यांच्या कामाचे प्रयत्न व श्रेय म्हणून त्यांना शिवसेना पक्षामार्फत परिसराच्या विकासासाठी पुणे जिल्हा नियोजन समिती मध्ये सदस्य पदावर काम करण्याची संधी उपलब्ध दिली आहे. ” pic=”” name=” -ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,जिल्हाप्रमुख-शिवसेना तथा सदस्य-जि.प.पुणे”]






