Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रतन टाटा उद्योगपती नव्हते तर देशाचे आधारस्तंभ होते’; संजय राऊत यांची आदरांजली

रतन टाटा यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते. नंतर प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर उद्योग, राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी शोक व्यक्त केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2024 | 12:05 PM
रतन टाटा उद्योगपती नव्हते तर देशाचे आधारस्तंभ होतो; संजय राऊत यांच्याकडे आदरांजली

रतन टाटा उद्योगपती नव्हते तर देशाचे आधारस्तंभ होतो; संजय राऊत यांच्याकडे आदरांजली

Follow Us
Follow Us:

मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आदरांजली अर्पण केली. ‘रतन टाटा उद्योगपती नव्हते. ते या देशाचे आधारस्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास देशाला मिळालेला रोजगार देशाला मिळालेली प्रतिष्ठा या सर्वांमागे टाटांचं योगदान आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

रतन टाटा यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते. नंतर प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर उद्योग, राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी शोक व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, ‘रतन टाटा उद्योगपती नव्हते तर या देशाचे आधारस्तंभ होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास देशाला मिळालेला रोजगार देशाला मिळालेली प्रतिष्ठा या सर्वांमागे टाटांचं योगदान आहे. टाटा हे असे व्यक्तिमत्व आहे की, ते घराघरात बसले आहे’.

तसेच देश हळहळत आहे त्याचं कारण असं आहे की, टाटा यांनी आपल्याला भरपूर दिले आहे. उद्योगपतींना प्रॉफिट आणि लॉस हेच माहित आहे. टाटा हे कमालीचे देशभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं योगदान आहे. सामाजिक लढ्यात त्यांचे योगदान आहे. मुंबईसारखं शहर घडवण्यात देखील त्यांचे योगदान आहे, याची इतिहासाला नोंद घ्यावी लागणार आहे.

कोरोना काळात दिल्या हजारो कोटींच्या देणग्या

‘आज उद्योगपतींची नावे घेतली तर त्यांच्यासाठी देश हा लुटण्याचा साधन आहे. पण टाटांसाठी देश एक निर्मितीचा साधन होतं. त्यांनी देश घडवला. टाटा यांनी कोरोना काळात आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहीत आहे. सर्वांत आधी कोरोनाशी लढण्यासाठी देणगी हजारो कोटी देण्यासाठी टाटा हे पुढे होते. टाटांनी फक्त माणसांचे हॉस्पिटल निर्माण केले नाही तर टाटांनी प्राणी, पक्षी, अनाथांसाठी आपला खजिना रिकाम केला’, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Ratan tata was not a businessman only but a pillar of the country says mp sanjay raut nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • Ratan Tata
  • sanjay raut

संबंधित बातम्या

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
1

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

TATA Sons AGM Breaking : टाटा समूहाच्या इतिहासातील पहिलीच घटना! टाटा संसची बैठक अचानक रद्द; काय आहे यामागचे मुख्य कारण?
2

TATA Sons AGM Breaking : टाटा समूहाच्या इतिहासातील पहिलीच घटना! टाटा संसची बैठक अचानक रद्द; काय आहे यामागचे मुख्य कारण?

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचा जल्लोष; ‘निर्लज्ज लोक’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
3

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचा जल्लोष; ‘निर्लज्ज लोक’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
4

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.