Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधांबाबत मोठा दावा केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 04:08 PM
Bachchu Kadu

Bachchu Kadu

Follow Us
Follow Us:

मुंबई : ठाकरे गटातील सलग घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी नेत्यांकडून ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली जात असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “आता सचिन अहिर आमच्याकडे आले आहेत, तर त्यांची टीमही येईल. आम्ही त्यांचे मित्र म्हणून स्वागत करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला बळकटी देण्याचं काम केलं आहे.”

यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला. “संजय राऊत यांच्या बेताल विधानांमुळे पक्षात मोठी नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी राहिलं होतं,” असा दावा बच्चू कडू यांनी केला. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

राज ठाकरे यांच्या टीकेवर सावध भूमिका

राज ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “हा विषय दिल्लीचा आहे. त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील,” असे ते म्हणाले.

मंत्रीपदाच्या चर्चेबाबत ते म्हणाले, “आमच्या वाट्याला मंत्रीपद आलं म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्यालाच आलं. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. पक्ष अधिक मजबूत करणं हाच आमचा अजेंडा आहे.”

पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सूचना

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “निसर्ग कोपला की शिवसैनिकांनी मदतीला धावून जायला हवं, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आम्ही त्या सूचनांचं पालन करू. संकटाच्या काळात आम्ही जनतेसोबत आणि शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत,” असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

TET पेपरफुटीवर कठोर कारवाईची मागणी

टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर बोलताना बच्चू कडू यांनी कठोर शिक्षेची मागणी केली. “पेपरफुटी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तसेच सैन्य भरतीप्रमाणे महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार व्हायला हवा. ६ जुलैपूर्वी याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी म्हटले.

Web Title: Bachchu kadu big claim on sanjay raut after sachin ahir joins shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politcs
  • Sachin Ahir
  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.