रशिया युक्रेन युद्धाचा आज १५ वा दिवस आहे. रशियाकडून अदयापही हल्ले सुरुच आहे. यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेलाय. आता युक्रेनबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. अमेरिकेने युक्रेनमध्ये रशियाच्या रासायनिक हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की रशिया युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रास्त्र हल्ल्याची योजना आखत आहे त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे.
दरम्यान, युक्रेन आणि युरोपियन मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी 13.6 अब्ज डॉलर निधी देण्याच्या द्विपक्षीय ठरावाच्या मसुद्याला बुधवारी यूएस काँग्रेसच्या सदस्यांनी सहमती दिली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या 15 ट्रिलियन डॉलरच्या उर्वरित बजेटचा भाग म्हणून फेडरल एजन्सींना कोट्यवधी डॉलर्सची अतिरिक्त मदत देण्यासही खासदारांनी सहमती दर्शविली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनला लष्करी, मानवतावादी आणि आर्थिक मदत देण्यासाठी 10 अब्ज डॉलरच्या बजेटची विनंती केली. दरम्यान, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने ही रक्कम 13.6 अब्ज डॉलर इतकी झाली.
[read_also content=”पंजाबमध्ये आपची सरशी, ६४ चा बहुमताचा आकडा ओलांडला, निवडणूक आयोगाच्या माहितीत आपला आघाडी, आपला मिळाली तब्बल ४२.९ टक्के पंजाब्यांची मते https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/punjab-assembly-elections-results-aap-is-big-political-party-in-punjab-says-election-commision-nrak-252337.html”]