Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सात्विक-चिराग जोडीने इतिहास रचला ; कोरिया ओपनमध्ये वर्षातील चौथे विजेतेपद पटकावले

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या नंबर एक जोडीचा फायनलमध्ये पराभव केला. कोरिया ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी 17-21, 21-13, 21-14 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला.

  • By Aparna
Updated On: Jul 23, 2023 | 10:40 PM
सात्विक-चिराग जोडीने इतिहास रचला ; कोरिया ओपनमध्ये वर्षातील चौथे विजेतेपद पटकावले
Follow Us
Close
Follow Us:

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या नंबर एक जोडीचा फायनलमध्ये पराभव केला. कोरिया ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी 17-21, 21-13, 21-14 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. बॅडमिंटनमधील जगातील अग्रमानांकित फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जोडीला हरवत भारतीय जोडीने पुरुष दुहेरीमध्ये कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन खिताब जिंकला. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी दमदार कामगिरी केली. इंडोनेशियाच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये 17-21 असा विजय मिळवला होता. पण चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी जोरदार पुनरागमन केले. दोघांनी पुढील दोन्ही सेट जिंकत विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये पराभव झाल्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने हार मानली नाही, त्यांनी जोरदार पुनरागमन केले. भारतीय जोडीने पुढील दोन्ही सेट सहज जिंकले. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला वरचढ होऊ दिले नाही. अखेरच्या दोन सेटमध्ये 21-13 आणि 21-14 अशा फरकाने चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी जोडीने बाजी मारली. याआधी भारतीय जोडीने सेमीफायनलमध्ये दुसऱ्या मानंकित जोडीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. आता त्यांनी अव्वल क्रमांकाच्या जोडीचा पराभव करत विजय मिळवला आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर निर्वादित वर्चस्व गाजवले. दोघांनी प्रत्येकवेळा दमदार खेळी करत जेतेपदाकडे आगेकूच केली. प्रतिस्पर्धी खेळाडूंना सामन्यात पुढे जाऊ दिले नाही.. अन् गेले तरी जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. उपांत्य फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 40 मिनिटांच्या गेममध्ये 21-15 आणि 24-22 असा पराभव केला. सात्विक आणि चिराग यांचा चिनी जोडीवरचा हा पहिलाच विजय ठरला. याआधी भारतीय जोडीला चिनी जोडीसमोर दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या वर्षी, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकले आहेत. सात्विक आणि चिराग या जोडीने अनेक जेतेपदे पटकावली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय थॉमस कपमध्येही भारतीय जोडीने सुवर्णपदक पटकावले. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर १००० जेतेपद पटकावली आहेत.

 

Web Title: Satwik chirag duo creates history won his fourth title of the year at the korea open nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2023 | 10:40 PM

Topics:  

  • Badminton
  • india
  • Sports News

संबंधित बातम्या

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?
1

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र
2

इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र

अमेरिकेला आर्थिक झटका? भारत-चीन डॉलरविरोधी मोर्चावर; लवकरच येऊ शकते नवीन पेमेंट सिस्टम
3

अमेरिकेला आर्थिक झटका? भारत-चीन डॉलरविरोधी मोर्चावर; लवकरच येऊ शकते नवीन पेमेंट सिस्टम

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा
4

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.