Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा

पुरुष हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये टीम इंडियाने मलेशियाला ४-१ ने हरवले. पहिल्याच मिनिटात गोल खाऊनही भारताने जोरदार पुनरागमन करत अंतिम सामन्याची आशा कायम राखली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 04, 2025 | 10:15 PM
Hockey Asia Cup 2025: टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम; पहिल्या मिनिटातच गोल खाऊनही मलेशियाचा ४-१ ने उडवला धुव्वा
Follow Us
Close
Follow Us:

India Beat Malaysia: पुरुष हॉकी आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ग्रुप स्टेजमधील तिन्ही सामने जिंकल्यानंतर, सुपर-४ राउंडमध्येही भारताने आपला पहिला विजय नोंदवला. या फेरीतील पहिल्या सामन्यात कोरियाविरुद्ध २-२ असा ड्रॉ खेळल्यानंतर, भारतीय हॉकी संघाने दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा ४-१ ने पराभव करत अंतिम सामन्यातील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. हा विजय दमदार असला तरी, त्यासाठी संघाला सुरुवातीला संघर्ष करावा लागला, कारण पहिल्याच मिनिटात मलेशियाने गोल करून भारतीय कॅम्पला धक्का दिला होता.

१-२ अशा पिछाडीनंतर पुनरागमन

बिहारच्या राजगीरमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी टीम इंडियाची लढत मलेशियाशी झाली. भारताने याआधीच्या सामन्यात कोरियाविरुद्ध ड्रॉ खेळला होता, जिथे त्यांनी १-२ अशा पिछाडीनंतर पुनरागमन केले होते. विशेष म्हणजे याच कोरिया संघाला मलेशियाने पूल स्टेजमध्ये ४-१ ने हरवले होते. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि तो टीम इंडियासाठी एक मोठे आव्हान मानले जात होता.

ALL THE ACTION, ALL THE GOALS! 🔥 Catch the highlights of India’s 4–1 victory over Malaysia in the Super 4s of the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025.#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/wGtg5nMNa9 — Hockey India (@TheHockeyIndia) September 4, 2025

हे देखील वाचा: Asia Cup 2025 : आशिया कपसाठी UAE चा संघ जाहीर! मोहम्मद वसीम करणार नेतृत्व; ‘या’ खेळाडूंना लागली लॉटरी 

पहिल्याच मिनिटात खाल्ला गोल

सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला या आव्हानाची जाणीव झाली. अवघ्या ५० सेकंदांमध्येच मलेशियाने पहिला गोल डागून स्टेडियममधील सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर, टीम इंडियाने सातत्याने हल्ला सुरू ठेवला आणि बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करत राहिली, पण त्यांना यशासाठी थोडी वाट पाहावी लागली. अखेरीस, १७ व्या मिनिटात मनप्रीत सिंगने पहिला गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

७ मिनिटांत गोलचा वर्षाव

या गोलनंतर भारतीय संघ पूर्णपणे सामन्यावर हावी झाला आणि पुढील ७ मिनिटांत स्कोअर ३-१ झाला. १९ व्या मिनिटात सुखजीत सिंगने आणि २४ व्या मिनिटात शिलानंद लाकडाने गोल करत मलेशियाच्या विजयाच्या आशांना धक्का दिला. दुसऱ्या हाफमध्ये ३८ व्या मिनिटात अनुभवी खेळाडू विवेक सागर प्रसादने संघाचा चौथा गोल करून राहिलेली कसर पूर्ण केली. यानंतर भारतीय संघाने आणखी गोल केले नाहीत, पण मलेशियालाही एकही गोल करू दिला नाही.

Web Title: Team indias winning streak continues despite conceding a goal in the first minute they thrashed malaysia 4 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 10:14 PM

Topics:  

  • Hockey Asia Cup 2025
  • Hockey Team India
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?
1

सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम
2

Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम

हार्दिक पांड्याने पापाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post
3

हार्दिक पांड्याने पापाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post

AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अ‍ॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान
4

AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अ‍ॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.