Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही…..”; महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवारांची मोदींवर बोचरी टीका

  • By युवराज भगत
Updated On: Feb 03, 2024 | 03:11 PM
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही…..”; महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवारांची मोदींवर बोचरी टीका
Follow Us
Close
Follow Us:

NCP chief Sharad Pawar on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. या दौऱ्यांवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २ फेब्रुवारी) रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले.

महाराष्ट्र दौऱ्यावरही खोचक टीका

उल्हासनगर गोळीबारसारख्या प्रकरणावरून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही खोचक टीका केली. शरद पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळते. महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत.

महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढतेय

“लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे, महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे, असे दिसते. माझी मागणी आहे की, गुजरातला ते गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात, तसे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल”, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर केली.

प्रकाश आंबेडकरांचा आग्रह योग्य

महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “मविआच्या बैठकीबाबत माझ्या सहकाऱ्यांनी मला माहिती दिली. अतिशय चांगली चर्चा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला, तो अतिशय योग्य आहे. केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही, तर काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी जागा कशासाठी जिंकायच्या, कोणत्या कार्यक्रमावर त्या जिंकायच्या यावर चर्चा झाली नाही तर नंतर मतभेद होतात. मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही योग्य आहे, असे मला वाटते.”

इंडिया आघाडीची स्थापना

इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले आहेत. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, नितीश कुमार यांनी एनडीएत जायचा निर्णय घेतला. पण खरं सांगायचं तर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. पण त्यांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याबद्दल काही सांगू शकत नाही. पण जे घडलं, ते चांगलं नाही झालं. पण बिहारमधील जनतेला त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. याचे परिणाम बिहारच्या निवडणुकीत दिसतील.

हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आदिवासीबहुल असलेल्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते. आदिवासी नेत्याबद्दल दिल्लीमधील प्रशासन अशी भावना ठेवत असेल तर ते योग्य नाही. सोरेन यांनी झारखंडमध्ये जी धोरणे राबविली ते पाहण्यासाठी दिल्ली आणि देशाबाहेरील जाणकार प्रशासकही येतात. असे असताना सोरेन यांच्या सहकाऱ्यांना अटक करून आत टाकले, हे काही योग्य नाही. सत्तेच्या गैरवापराला आज काही मर्यादा राहिली नाही.

Web Title: Sharad pawar criticizes pm modi on maharashtra tour they said if they announce to give something after coming nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • NCP Chief Sharad Pawar
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला
1

दिल्लीत कपिल शर्मा शो आणि महाराष्ट्रात हास्य जत्रा,पवार साहेबांच्या वक्तव्यावर …”; नरेश म्हस्के यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी
2

Maharashtra Politics : राज-उद्धव एकत्र येताच मविआची काय स्थिती? राष्ट्रवादी खुश तर कॉंग्रेसची रुसाफुगी

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान
3

थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

Uddhav Thackeray News:  ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.