Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut: मविआचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींच्या ऑफरचा संजय राऊत यांचा दावा, भाजपचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराला शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत राऊतांनी गंभीर आरोप केले असून भाजपने त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 05, 2026 | 02:45 PM
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Follow Us
Follow Us:

ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार सचिन अहिर यांनीसुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत असतानाच आता महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसू शकतो. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत मोठा दावा केला असून आगामी काळात एकनाथ शिंदे आणखी एक आमदार फोडू शकतात असे विधान त्यांनी केले आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराला फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत, त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला.

धीरज लिंगाडेंना 20 कोटींची ऑफर?

संजय राऊत म्हणाले, “माझ्या कानावर आले आहे की धीरज लिंगाडे यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आमदारकीचं आश्वासनही त्यांना देण्यात आलं आहे. ही घटना काल-परवाची आहे.”

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

राऊत यांनी हा आमदार ठाकरे गटाचा नसून काँग्रेसचा असल्याचे स्पष्ट करत, महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवरही जोरदार टीका केली. “तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि पैसा आहे. पण हा पापाचा पैसा आहे, तो कुणालाही पचणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “मोदी अमर आहेत का? अमित शाह अमर आहेत का? फडणवीस आणि शिंदे अजरामर आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सत्तेच्या अहंकारावरही निशाणा साधला.

भाजपची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या आरोपांवर भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, कोणत्याही लोकप्रतिनिधीबद्दल पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. “संजय राऊत यांच्या अशाच वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षातील लोक त्यांना सोडून जात आहेत,” असा पलटवार भोयर यांनी केला.

‘ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही’; ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे मोठे विधान

सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट सावध

दरम्यान, माजी मंत्री सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर पक्षात आणखी फूट पडण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षातील आमदारांशी थेट संवाद साधून पुढील रणनीती ठरवण्याबरोबरच संभाव्य पक्षांतर रोखण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Sanjay raut claims congress mlc dhiraj lingade offered rs 20 crore by eknath shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahavikas Aghadi
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा
1

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.