"कोकण रेल्वेचे राज्य व केंद्रस्तरावरील प्रश्न लवकरच सोडवू";खासदार नारायण राणे यांचं आश्वासन
सिंधुदुर्ग: आर्थिक डबगाईत चाललेल्या कोकण रेल्वेच्या सोयी सुविधा राज्य अंतर्गत प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविले जातील. तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातीलआंबा पिकासाठी रो -रो सेवा व अन्य सुविधा प्रश्नाला न्याय देण्यासाठी लक्ष केंद्रीत करू भावनिक न होता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा ही स्टेशन चा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वस्तू स्थितीदर्शक अहवाल तयार करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे आग्रही पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या भेटीत दिली.
कणकवली येथील माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या माध्यमातून शुभेच्छापर भेट घेतलीयावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर कणकवली रेल्वे स्टेशन अध्यक्ष सुरेश सावंत सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन अध्यक्ष शुभम परब नांदगाव रेल्वे स्टेशन अध्यक्ष संतोष राणे आचरणे रेल्वे स्टेशन अध्यक्ष पडितराव राणे वसंत तांडे ल स्वप्निल गावडे जिल्हा समिती सचिव अजय मयेकर जिल्हा समिती खजिनदार साई आंबेरकर संजय वालावलकरस्वप्निल गावडेसंकेत राणेआदींसह उपस्थित होते.प्रारंभी खासदारपदी निवड झाल्याबद्दल आणि कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग व काही स्टेशन वरील प्रश्नांना न्याय देण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाबद्दलसमितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष प्रकाश पावस्कर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गातील दहा स्टेशनच्या अनेक समस्या प्रवाशांना भेळसावत आहेत मधुरा ते खारेपाटण या मार्गावरील प्रत्येक स्टेशनच्या समस्यांवर चर्चा केली. नांदगाव रेल्वे स्टेशनवर कृषी बाजार समितीच्या माध्यमातून होऊ घातलेले मार्केट यार्ड त्या दृष्टीने आंबा पिकासाठी स्वतंत्र बोगी सेवा मिळणे आवश्यक आहे अशी मागणी नांदगाव समिती अध्यक्ष संतोष राणे यांनी मांडली तर वैभववाडी आचरणे स्टेशनचे अध्यक्ष पंडितराव राणे यांनी वैभववाडी हे जंक्शन स्टेशन असून या स्टेशनवर महत्त्वाच्या जलद गाड्यांना थांबा मिळावा अचिरणे स्टेशनवर प्रवाशांना उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही यास अनेक सुविधा पासून स्टेशन वंचित आहे रस्ता ही नादुरुस्त आहे अशी समस्या मांडली सिंधुदुर्ग स्टेशनचे अध्यक्ष शुभम परब यांनी सिंधुदुर्ग या जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर प्रवाशांना तिकीट मिळावे यासाठी पी आर एस सिस्टीम सुरू करावे किल्ला मुख्यालय असूनही जलद गाड्यांना थांबा नाही.
यामुळे या स्टेशन नजीक दोन मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज एम आय टी एम कॉलेज वकील कॉलेज या जिल्हा मुख्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मुंबई व अन्य ठिकाणी बैठकीसाठी जाताना जलद गाड्यांची सोय होत नाही कुडाळ कणकवली जावे लागते स्टेशनच्या परिसरातील पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोळीसाठी निवारा शेड उभाराव्यात अनेक गैरसोयी असून नुकतेच सुशोभीकरणहोऊ नये जलद गाड्या तिकीट कोटा व अन्य सुविधांपासून हे स्टेशन वंचित आहे कोरोना पासून दिवा रत्नागिरी मडगाव ही नियमित पहाटे मडगाव कडे जाणारी रेल्वे बंद केली रत्नागिरी दादर रत्नागिरी मडगाव ही सुद्धा गाडी बंद झाली आहे रत्नागिरी वरून पहाटे चार वाजता सदर गाडी सुटल्यास गोवा मडगाव कडे जाणाऱ्या अनेक बेरोजगार युवकांना भाजीपाला व्यावसायिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुविधांसाठी जाणाऱ्या नागरिकांना सोयीची ठरणार आहे परंतु रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
कसाल प्रवासी रेल्वे समितीचे सचिव साई आंबेरकर यांनी कोकण रेल्वेच्या डीपीआर नकाशामध्ये कसाल हे रेल्वे स्टेशन समाविष्ट आहे गेल्या काही वर्षांपूर्वी आचिर्णे स्टेशन होऊ शकले परंतु कसाल हे मुंबई गोवा महामार्गावरील नियोजित रेल्वे स्टेशन साठी जागा उपलब्ध असुनही सदरचे स्टेशन अद्यापही प्रतीक्षेत आहे येथील दश क्रोषीच्या ग्रामस्थांचीहे नियोजित स्टेशन व्हावे अशी सातत्याने मागणी आहे याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी केली. जिल्हा समन्वय नंदन वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या दहा ही स्टेशनचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेतप्रवासी समितीचा पाहणी दौरा होणे आवश्यक आहेत्या अहवालानुसार रेल्वे मंत्र्यांकडे विविध प्रश्नांची मागणी करणे सोयीचे ठरेल कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग सह अनेक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे डिजिटल बोर्ड असणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रक आणि कोणत्या दिवशी कोणती गाडी किती वाजता थांबेल याचे सुस्पष्ट फलकलावणे आवश्यक आहे जेणे करून प्रवाशांना आठवड्यातून स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती पुरेपूर होऊ शकेल कोकण रेल्वे तोट्यात आहे परंतु प्रवाशांच्या सुविधांकडे आणि समस्यांकडे लक्ष देत नाही यावर आपण लक्ष द्यावा आणि कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत प्रयत्न करावे.जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी या सर्व प्रश्नांबाबत आपण लक्ष देऊन वस्तूस्थितीदर्शक अहवालाची माहिती घेऊनरेल्वे मंत्र्यांकडे आपल्या समवेत एक बैठक आयोजित करण्याबाबतचा विचार करावा अशी सूचनाही मांडले.
यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले या सर्वच प्रश्नावर राज्यस्तरावरच्या न्याय प्रश्नांना उकल घेण्यासाठीराज्य शासनाकडे कोकण रेल्वेच्या स्टेशन अंतर्गत सुविधासाठी झालेल्या कराराबाबत ची माहिती घेऊन शेड व अन्य सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार मार्फत प्रयत्न करू व त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आणि गोवा केरळ प्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ही रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करावाया दृष्टीने आपले प्रयत्न राहतील कोकणवासीय जनतेने भावनिक न होता प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी आर्थिक अडचणी असलेली कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून सर्व सुविधा पुरविण्यासाठी आपला सर्व प्रवासी जनतेचा हातभार लागावा जेणेकरून रेल्वेचे प्रश्न समस्या सुटू शकतील तसेच गोवा केरळ व अन्य राज्यांना कोकण रेल्वेचा तीन टक्के सीएसआर फंड सिंधुदुर्ग रत्नागिरी महाराष्ट्र राज्यांतिल जिल्ह्यांमध्ये खर्च झाला नसेल तर तो सी एस आर फंड प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करू तसेच कसाल या नियोजित रेल्वे स्टेशनसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नवीन रेल्वे स्टेशन व्हावे यासाठीपाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिली आहे.