'लाडकी बहीण'नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना... (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. यंदा महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळाले असून सरकार स्थापन होऊन महिना होत आला आहे. मात्र महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे आणि खातेवाटपामध्ये महायुतीचे अनेक नेते आहेत. महायुतीमध्ये फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शनमोडमध्ये आहेत. इतर नेत्यांनी मात्र अद्याप त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्यामध्ये सध्या बीडमधील हत्येवरुन राजकारण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपरहण करुन हत्या करण्यात आली. यावरुन नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मास्टर माईंड वाल्मिक कराड याने सरेंडर केले आहे. यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले की, “आरोप प्रत्यारोप होत नाहीत आरोपी कोण आहे कळलं आहे. अजून आरोपी पकडले आहेत अजून एक आरोपी राहिला आहे, कडक कारवाई झाली पाहिजे, परत अस कोणी करून नये अशी कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे रोहित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांची छाननी केली जात असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार म्हणाले की, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी एक योजना आणली. सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले परत टप्प्याटप्प्याने 70 टक्के शेतकऱ्यांचे पैसे थांबले आहे. आता इलेक्शन झालं आहे. बहुमत भाजप मित्र पक्षाला मिळालं आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने आमच्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवतील अनेक बहिणी वंचित आहेत जे आत्ता मिळत आहेत ते कमी करतील. आम्ही विरोधात आहोत त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीसाठी भांडू,” असा पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राजकारणासंबंधी बातम्या वाचा
महायुतीच्या अनेक नेत्यांनी अद्याप त्यांच्या त्यांच्या खात्यांचा कारभार हाती घेतलेला नाही. तसेच पालकमंत्रिपदावरुन देखील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यावर रोहित पवार म्हणाले की, “महायुतीच्या नेत्यांना मंत्री पद दिली गेली पण ठराविक मंत्री सोडलं तर कोणी काम करत नाहीत. बरेच मंत्री नाराज आहेत. निधी नसणाऱ्या खात्याचे मंत्री केल्या असल्याचं कळत आहे, येथे असलेले खाते कशासाठी हवे होते पैसे खाण्यासाठी हवे होते का? हे पण स्पष्ट करावं, जिल्ह्याचे पालकमंत्री कशासाठी हवाय तर जिल्ह्यासाठी बजेट बघून पालकमंत्री व्हायचे आहे काय गडबड सुरू आहे कळत नाही, आजचे जनतेने तुम्हाला बहुमत दिलं आहे. राज्याला सुरळीत आणि चांगल्या दिशेने घेवून जायचं सोडून पालकमंत्री पदासाठी भांडत बसले आहेत. आशिष देशमुख विदर्भ, नागपूरमधील मोठे नेते आहेत,नामदार झाले आहेत,उगाच काही बोलणं योग्य नाही बातमी व्हावी यासाठी बोलत असतील तर माहिती नाही,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.