Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर

Milk Price Hike: तमिळनाडूमध्ये आरोग्या ब्रँडनंतर हेरिटेज, तिरुमाला आणि जर्सी या खासगी दूध कंपन्यांनीही दुधाचे दर वाढवले आहेत. मिली टोन्ड मिल्कचा पॅकेट 31 रुपयांवरून 32 रुपये, स्टँडर्डाइज्ड मिल्क 35 वरून 37 रुपये आणि फुल क्रीम मिल्क 40 वरून 42 रुपये झाले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 11:00 AM
Milk Price Hike: दूध महागलं, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Milk Price Hike: दूध महागलं, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हेरिटेज, तिरुमाला आणि जर्सीसह खासगी दूध कंपन्यांनी दर वाढवले.
  • 500 ग्रॅम दह्याच्या पॅकेटच्या दरातही 1 रुपयाची वाढ.
  • खासगी दूध महागल्याने आविनच्या मागणीवर आणि पुरवठ्यावर दबाव येण्याची शक्यता.
Milk Price Hike in Tamil Nadu: तमिळनाडूमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मोठ्या खाजगी कंपन्यांनी एकदम भाव वाढवले तसेच नवे दर सुद्धा लागू केले. सरकारी कंपनी आविनच्या दुधावर लोड वाढणार आहे. Milk Price Hike:

किती वाढले भाव?

आरोग्या ब्रँडने 21 सप्टेंबरला भाव वाढवले. त्यानंतर आता हेरिटेज, तिरुमाला आणि जर्सी सारख्या मोठ्या कंपन्यांनी पण दर वाढवले आहेत.आता नवीन दर कसे आहेत.

  • मिली टोन्ड मिल्कचा पॅकेट आधी 31 रुपयाला होता, आता 32 रुपये झाले.
  • स्टँडर्डाइज्ड मिल्क 35 रुपयांवरून 37 रुपये झाला.
  • फुल क्रीम मिल्क 40 रुपयांवरून 42 रुपये झाला.
  • 1 लिटरच्या पॅकेटचं पण तेच आहे. टोन्ड मिल्क 61 रुपये, स्टँडर्डाइज्ड 70 रुपये आणि फुल क्रीम 81 रुपयाला गेलं आहे.
  • दह्याच्या 500 ग्रॅमच्या पॅकेटवर पण 1 रुपयाने वाढ झाली .
  • एक-एक रुपया वाटतो पण रोजच्या दुधात महिन्याला 100-200 रुपयांचा फरक पडतो.

आविनच्या दुधाची मागणी वाढणार?

खाजगी कंपन्यांनी भाव वाढवल्यामुळे आता सरकारी कंपनी आविन आणि खाजगी कंपन्यांच्या भावात खूप फरक पडला आहे. तमिळनाडू मिल्क एजंट्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पोन्नुसामी यांनी सांगितलं की, खाजगी दूध महाग झाल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आता स्वस्त असलेलं आविनचं दूध घ्यायला जातील. साहजिकच आहे, जिथे स्वस्त मिळेल तिथेच लोक जातील.पण यामुळे एक नवीन प्रॉब्लेम तयार होईल. आविनच्या दुधाची मागणी एकदम वाढली तर पुरवठा कमी पडेल. एजंट लोकांनाच टेन्शन आलं आहे की उद्या दूधच मिळालं नाही तर काय करायचं?

आविन तोट्यात आहे का?

या संघटनेने अजून एक गोष्ट सांगितली. आविन शेतकऱ्यांकडून दूध विकत घेते, त्याचा भाव सरकारने नुकताच 6 रुपयांनी वाढवला आहे. आविनला दूध महागात घ्यावं लागतंय. खाजगी कंपन्यांनी पण शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यायला सुरुवात केली आहे.

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी …

पण आविनने मात्र आपला विक्रीचा दर वाढवला नाही. म्हणजे घेणं महाग आणि विकणं स्वस्त, यामुळे आविनला तोटा सहन करावा लागतो, असं एजंट संघटनेचं म्हणणं आहे.त्यामुळे त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की आविनच्या दुधाच्या दराचा परत एकदा विचार करा. नाहीतर कंपनी अडचणीत येईल.

सरकारकडे काय मागणी?

दूध एजंट संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. दुधाचं उत्पादन, खरेदी, वाटप आणि विक्री या सगळ्यासाठी एक वेगळा विभाग बनवा, जो सगळं बघेल. आणि खाजगी कंपन्या सारख्या भाव वाढवतात, त्यावर पण काहीतरी कंट्रोल आणा.सध्या तरी परिस्थिती अशी आहे की खाजगी दूध महाग झाल्यामुळे लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे आणि सरकारसमोर आविनचं दूध सगळ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं हे मोठं चॅलेंज असणार आहे.

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर

Web Title: Tamil nadu milk price hike heritage thirumala jersey new rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Milk Price Hike
  • Milk Prices

संबंधित बातम्या

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच
1

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच

Gokul News : महायुतीची सत्ता येताच गोकुळचा मोठा निर्णय! दूध दरात केली ऐतिहासिक वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
2

Gokul News : महायुतीची सत्ता येताच गोकुळचा मोठा निर्णय! दूध दरात केली ऐतिहासिक वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री

Jalgaon News: घरफोडीसाठी शिरला अन् नागरिकांच्या तावडीत सापडला! चोपड्यात चोरटा अटकेत
3

Jalgaon News: घरफोडीसाठी शिरला अन् नागरिकांच्या तावडीत सापडला! चोपड्यात चोरटा अटकेत

Indian Economy: केंद्राच्या तिजोरीला भगदाड; रोजच्या खर्चासाठीही नव्याने कर्ज घेण्याची वेळ
4

Indian Economy: केंद्राच्या तिजोरीला भगदाड; रोजच्या खर्चासाठीही नव्याने कर्ज घेण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.