भोपाळ : छतरपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना चवहीन आणि थंड चहा (Tasteless And Cold Tea) पुरवल्याबद्दल कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला (Junior Supply Officer) कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Social Media) झाली. त्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.
चायवाल्यांचा तिरस्कार कशाला, असा सवाल काँग्रेसने (Congress) मुख्यमंत्री चौहान यांना केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रीवाला येथे जाताना छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो विमानतळावर (Khajuraho Airport) थांबले. तिथे त्यांना दिलेला चहा चवहीन आणि थंड होता. या संदर्भात राजनगर येथील कनिष्ठ पुरवठा अधिकारी राकेश कान्हावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राजनगरचे एसडीएम डीपी द्विवेदी यांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ११ जुलै रोजी खजुराहोला गेले होते. यावेळी त्यांना थंड व निकृष्ट दर्जाचा चहा देण्यात आला. तेव्हा, या नोटिसला तीन दिवसांत उत्तर द्या.






