संजय राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं (Photo - X)
मुंबई : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित ‘भारत भाग्यविधाता’ कार्यक्रमात राजकीय वातावरण चांगलेच रंगले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन करण्याचा प्रयत्न केला तरी या देशात शेवटपर्यंत नेहरूच राहतील, असे ठणकावून सांगत त्यांनी नेहरूंच्या विचारांचे समर्थन केले. (Sanjay Raut)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारत भाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, नेहरू हे व्यक्तिस्वातंत्र्याचे खरे प्रणेते होते. त्यांच्यावर कितीही टीका झाली तरी त्यांनी विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली नाही.
नेहरूंवर टीका करणाऱ्यांच्या घरी त्यांनी ईडी किंवा सीबीआयच्या धाडी टाकल्या नाहीत, असा टोला राऊत यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीला उद्देशून लगावला.
नेहरूंच्या सहिष्णुतेचे उदाहरण देताना राऊत यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांचा उल्लेख केला. शंकर यांनी नेहरूंचे व्यंगचित्र काढले होते, मात्र नेहरूंनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. आजच्या काळात पंतप्रधानांचे असे व्यंगचित्र काढल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते, अशी टीका त्यांनी केली.
नेहरू धर्मनिरपेक्ष आणि दूरदृष्टीचे नेते होते. भाकरा-नांगल धरण, आयआयटी संस्था आणि अणुऊर्जा क्षेत्राच्या विकासातून त्यांनी देशाला वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. विरोधी विचारांच्या लोकांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे राऊत म्हणाले.
यावेळी माजी खासदार कुमार केतकर यांनीही नेहरूंच्या विचारांचे महत्त्व सांगितले. आज जगात युद्धजन्य परिस्थिती असताना नेहरूंचा शांततेचा आणि जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळणे ही भारतीय लोकशाहीची महत्त्वाची उपलब्धी असल्याचे केतकर यांनी सांगितले. नेहरूंचा वैश्विक दृष्टिकोन आजही मार्गदर्शक ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, कुमार केतकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
Ans: नरेंद्र मोदी आणि भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात शेवटपर्यंत नेहरूच राहतील, असे संजय राऊत म्हणाले.
Ans: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Ans: कुमार केतकर यांनी नेहरूंचा जागतिक दृष्टिकोन, शांतता, लोकशाही आणि सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले,






