Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India’s 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेस वेवर एका लॉरीने धडक दिली. भारताचे अनेक खेळाडूंना अपघाताचा सामना करावा लागलाय, त्यांनी मृत्यूला मात देत पुन्हा आपली कारकीर्द उजळवली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 21, 2025 | 06:46 PM
Team India's 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन

Team India's 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन

Follow Us
Close
Follow Us:

Team India’s 9 Players Car Accident : टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी कार अपघाताचा बळी ठरला. वर्धमानला जात असताना, त्यांच्या रेंज रोव्हर कारला एका लॉरीने धडक दिली. यानंतर, सौरव गांगुलीच्या गाडीच्या चालकाने गाडी नियंत्रित करण्यासाठी ब्रेक लावला तेव्हा अचानक ताफ्यातील सर्व वाहने एकामागून एक त्यांच्या गाडीवर आदळली. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले. मात्र, तो थोडक्यात बचावला. त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. असे जीवघेणे अपघात यापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटूंसोबत घडले आहेत. अपघातानंतर मृत्यूला हरवणाऱ्या या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
राहुल द्रविड
कालच सौरव गांगुलीच्या अपघाताअगोदर याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या कारला एका लोडिंग ऑटोने मागून धडक दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला होता. धडकेनंतर त्याच्या गाडीला मोठा खड्डा पडला. तथापि, समाधानाची गोष्ट अशी होती की, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पण टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड आणि ऑटो चालक यांच्यात जोरदार वाद झाला.
ऋषभ पंत
भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा भीषण अपघात तर सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अंजन घालणारा होता. सन २०२२ मध्ये, दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. यानंतर त्याच्या गाडीला आग लागली. या जीवघेण्या अपघातातून पंतला वाचणे कठीण वाटत होते. पण त्याने त्याचे नशीब बलवत्तर आणि स्वतः त्याचे कमालीच्या धाडसाने त्याने मृत्यूला मात देत आपली कारकीर्द पुन्हा उजळवली. या भयानक अपघातात त्याची क्रिकेट कारकीर्द संपली असेच मानले जात होते. पण पंत जवळजवळ दोन वर्षांनी चमत्कारिकरित्या क्रिकेटच्या मैदानावर परतला.
मोहम्मद शमी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध खळबळ उडवून देणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील कार अपघाताचा बळी ठरला आहे. ७ वर्षांपूर्वी २५ मार्च २०१८ रोजी ते डेहराडूनहून नवी दिल्लीला परतत होते. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या सुमारास एका ट्रकने शमीच्या टोयोटा कारला धडक दिली. या अपघातात शमीला काही दुखापत झाली आणि त्याच्या डोक्याला १० टाके घालावे लागले.
प्रवीण कुमार
२०२३ मध्ये मेरठमध्ये झालेल्या एका मोठ्या कार अपघातातून माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार थोडक्यात बचावले. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, तो देखील आपल्या मुलासह पांडवनगर परिसरातून परतत होता. त्यानंतर त्यांच्या लँड रोव्हर डिफेंडर कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली. प्रचंड टक्कर होऊनही, प्रवीण कुमार आणि त्यांच्या मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.

जोगिंदर शर्मा
२००७ च्या टी-२० विश्वचषकाचा हिरो आणि वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मानेही कार अपघातात मृत्यूला हरवले आहे. २०११ मध्ये, नवी दिल्लीतील द्वारका येथे त्यांची कार एका बीपीओ वाहनाला धडकली. यानंतर त्याला ICU मध्ये दाखल करावे लागले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. फ्रॅक्चरसोबतच रक्ताच्या गुठळ्याही तयार झाल्या होत्या. जोगिंदर शर्मा यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यांना सुमारे ४०-४५ टाके घालावे लागले.

सुनील गावस्कर
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर २०१४ मध्ये एका अपघातातून थोडक्यात बचावले. खरंतर, भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर तो मँचेस्टरहून लंडनला जात होता. यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, एका कारची त्याच्या जॅग्वारशी टक्कर झाली. पण या अपघातात तो थोडक्यात बचावला.
मोहम्मद अझरुद्दीन
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन देखील रस्ते अपघाताचा बळी ठरला आहे. खरंतर, २०२० मध्ये तो त्याच्या कुटुंबासह रणथंभोरला जाणार होता. त्यानंतर सुरवाल येथील कोटा मेगा हायवेवर त्याचा कार अपघात झाला. या अपघातात अझरुद्दीनला किरकोळ दुखापत झाली आणि तो सुखरूप बचावला.
मन्सूर अली खान पतौडी
१९६१ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांचाही अपघात झाला होता. ईस्ट ससेक्समधील होव्ह येथे त्यांची कार दुसऱ्या वाहनाशी धडकली. या अपघातात त्याने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी आपला उजवा डोळा कायमचा गमावला. त्यावेळी त्याने भारतासाठी पदार्पणही केले नव्हते. पण अपघातानंतर ६ महिन्यांनी पतौडी पुन्हा मैदानात परतले. तो केवळ टीम इंडियासाठी खेळला नाही तर वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात तरुण कसोटी कर्णधारही बनला.

Web Title: Team indias 9 players car has met with an accident know how they defeated death letest former captain sourav ganguly has become a victim of a car accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • Mohammad Azharuddin
  • Mohammed Shami
  • Rahul Dravid
  • Rishabh Pant
  • Sourav Ganguly
  • Sunil Gavaskar
  • Team India

संबंधित बातम्या

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड
1

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद
2

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
3

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात
4

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.