Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?

आजच्या तरुण पिढीला कोणती गोष्ट का आवडेल याचा नेम नाही. महिंद्रा कंपनीच्या 'थार' या कारचं लक्षही मागच्या काही काळात तरुण पिढीनं असंच काहीसं वेधलंय.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 31, 2026 | 05:40 PM
‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?
Follow Us
Follow Us:

कारगाड्यांची आणि वाहनांची आवड तर लोकांना जुन्या काळापासूनच आहे; मग त्यात प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार वेगवेगळ्या कार त्यांना पसंत पडतात. एखाद्या जनरेशन मध्ये जसं सगळ्यांच्या आवडी बहुतेक सारख्याच असतात, आणि त्यामुळे त्यांच्या पसंतीही बहुतेक सारख्याच असतात. असंच काहीसं या पिढीबरोबरही झालंय.

थार कारचा लुक

2010 मध्ये लाँच झालेल्या महिंद्रा कंपनीच्या थार गाडीने तरुण पिढीचं लक्ष लगेच वेधून घेतलं. क्लासिक जीपच्या पुढची पिढी बनवत बनवत महिंद्राने तरुणांना एक ऑफ-रोडिंग’ एसयूव्ही दिली. अगदी तरुणांच्या स्वभावाला शोभेल अशी, डोंगर द्दर्यात, कड्या कपारीत उत्साहाने आणि न थकता फिरेल अशी ही महिंद्राची थार एक ट्रेंड बनत गेलीय. जीप सदृश लुक, रंगांमध्येही अगदी कमी आणि क्लासि रंग, बॉडीमध्ये एक भव्यपणा, कुठल्याही खडतर प्रवासात आरामात चालणारी अशा या तिच्या विशेष गोष्टींमुळे थार ही कार तरुणांच्या लक्ष वेधण्याच कारण बनत आहे.

मागच्या काही वर्षात थारच्या नवीन मॉडेल्सनी तर अजून प्रसिद्धी मिळवली आहे. थार म्हणजे रुतबा आणि रावडी लुक, या तयार झालेल्या ट्रेंडमुळे थारची अजून जास्त प्रसिद्धी झाली आहे.

Mahindra Thar Roxx घेणाऱ्यांचा विश्वास कैक पटीने वाढला, Bharat NCAP मध्ये मिळाली 5 स्टार रेटींग

थार कारचा इतिहास

राजस्थाथान मधील ‘थार’ वाळवंटाच्या नावावरून बोलावल्या जाणाऱ्या  या महिंद्राच्या  कारला एका बाजूला तरुण पिढीने उचलून धरले आहे. तरी, काही जणांच्या मते थार ही कार लोक रुतबा आणि अहंकार दाखवण्यासाठी सुद्धा घेतायत. लोकांची मतं वेगवेगळी तर आहेच, पण या थारचा इतिहास तर काही वेगळीच बाजू मांडून गेला आहे.

दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत

महिंद्रा थारचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाशी आणि अमेरिकन ‘विलीज’ जीपशी जोडला गेलेला आहे. 1940 च्या दशकात, दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन लष्करासाठी एक हलकी, मजबूत आणि सर्व प्रकारच्या खडतर रस्त्यांवर धावू शकेल अशी गाडी तयार करण्यात आली होती. युद्धाच्या दृष्टीने बनवण्यात आलेली, ही थारसदृश जीपची पहिली आवृत्ती होती. युद्ध संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या या गाड्या महिंद्राने भारतात आणल्या आणि 1949 मध्ये विलीज जीपचे सुटे भाग भारतात जोडून निर्मिती सुरू केली. महिंद्राने अनेक दशके क्लासिक जीप  मॉडेल बनवल्यानंतर, पूर्णपणे भारतीयांच्या आवडीनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानासह 2010 मध्ये अधिकृतपणे महिंद्रा थार लाँच केली.

Web Title: Thar car craze in youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mahindra
  • Mahindra And Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.