Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

ब्रिटिश झेंड्याची थीम, 204hp पॉवर आणि 18-इंच अलॉय व्हील्स... ही खास मिनी नेमकी किती स्पेशल आहे? Mini Cooper Oxford Edition साठी भारतात प्री-लाँच बुकिंग सुरू झाली असून, लिमिटेड युनिट्समुळे तिची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 08, 2026 | 06:22 PM
मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
Follow Us
Follow Us:
  • मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी भारतात प्री-लाँच बुकिंग सुरू झाली असून किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.
  • Union Jack थीम, 18-इंच अलॉय व्हील्स आणि खास इंटीरियरमुळे कारचा लूक नेहमीच्या कूपरपेक्षा वेगळा दिसतो.
  • 204hp पॉवर आणि 300Nm टॉर्कसह ही कार 0 ते 100kmph वेग फक्त 6.6 सेकंदात गाठते.
ब्रिटिश स्टाइल आणि स्पोर्टी ड्रायव्हिंगचा एक्सपिरीयंस आवडणाऱ्या कस्टमर्ससाठी मिनी इंडियाने खास बातमी दिली आहे. कंपनीने भारतात मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू केली आहे. ही लिमिटेड एडिशन कूपर S 3-डोअरवर आधारित असून, यामध्ये ब्रिटिश फ्लॅग म्हणजेच Union Jack थीमचा खास वापर करण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या कारची ऑफीशली किंमत आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही.

Union Jack थीमने वेगळा लूक

ऑक्सफर्ड एडिशनमध्ये कॉन्ट्रास्टिंग व्हाइट रूफसह मोठे Union Jack ग्राफिक्स देण्यात आले आहेत. बोनट आणि बूटवरही त्याच थीमच्या स्ट्राइप्स मिळतात. टेलगेटवर ब्रिटिश फ्लॅग डेकल्स, खास व्हील हब कॅप्स आणि Union Jack व्हॉल्व कॅप्स देण्यात आले आहेत. कार Indigo Sunset Blue आणि Chilli Red अशा 2 रंगांमध्ये मिळेल. दोन्ही रंगांसोबत व्हाइट मिरर कॅप्स देण्यात आले आहेत. 18-इंच Slide Spoke अलॉय व्हील्स आणि कस्टमायजेबल LED DRLs देखील मिळतात.

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

204hp पॉवर आणि 300Nm टॉर्क

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनमध्ये 2.0-लिटर, 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 204hp पॉवर आणि 300Nm टॉर्क तयार करते. 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या माध्यमातून पॉवर पुढच्या चाकांना मिळते. ही कार 0 ते 100kmph वेग 6.6 सेकंदात गाठते, तर कंपनीने 16.82kmpl मायलेजचा दावा केला आहे.

केबिनमध्येही प्रीमियम टच

कारच्या इंटीरियरमध्ये JCW स्पोर्ट सीट्स, ब्लॅक अपहोल्स्ट्री, बेज-ग्रे निटेड डॅशबोर्ड आणि सिल्व्हर अॅक्सेंट्स मिळतात. 240mm सर्क्युलर OLED टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले, Harman Kardon साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि हीटेड स्टीअरिंग व्हील यांसारखी फीचर्सही आहेत.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

ADASसह भरपूर सेफ्टी फीचर्स

सेफ्टीसाठी ADAS, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन मॉनिटरिंग, ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल मिळते. पार्किंगसाठी फ्रंट-रियर सेन्सर्स, रिव्हर्सिंग कॅमेरा आणि पार्किंग असिस्टंटही देण्यात आला आहे.

ऑक्सफर्ड एडिशनचे नाव ब्रिटनमधील Oxford शहरावरून ठेवण्यात आले आहे. 1959 मध्ये याच ठिकाणी मूळ मिनीचे प्रोडक्शन सुरू झाले होते. त्यामुळे ही लिमिटेड एडिशन मिनीच्या ब्रिटिश वारशाला आधुनिक आणि खास अंदाजात पुढे नेते.

Web Title: Mini cooper oxford edition pre launch booking india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
1

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
2

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!
3

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
4

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.