‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राने आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करणे गरजेचं आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की त्यांनी हि मर्यादा शिथील करावी.’ असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलं आहे.
‘फेसबूक लाईव्ह’मध्ये राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “जेव्हा मी दिल्लीत (जूनमध्ये) पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, तेव्हा मी त्यांना सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. आणि राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला आहे. आता, केंद्राने राज्यांना अधिकार दिले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली पाहिजे. मला आशा आहे की पंतप्रधान तसे करतील.”
त्यामुळे आता जोपर्यंत आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा शिथिल केली जात नाही तो पर्यंत मराठा आरक्षण पूर्ववत होऊ शकत नाही.