
Raj Thackeray Uddhav Thackeray joint interview by Sanjay Raut and Mahesh Manjrekar
महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. यानिमित्ताने खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे बंधू यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. पहिल्यांदा दोन्ही नेत्यांना एकत्र येण्यामागे वीस वर्षे का लागली असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. याबाबत राज ठाकरे म्हणाले की, एवढा वेळ का लागला हे आता मागे सोडले पाहिजे. यापेक्षा आता महाराष्ट्रावर अशी वेळ आली आहे की आता नाही तर कधीच नाही. ही आमच्या अस्तित्वाची लढाई नाही तर मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई, ठाण्यामध्ये मराठी माणसांची काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार नाराज? संदीप देशपांडे पक्ष सोडण्याच्या चर्चांवर स्पष्टच मांडलं मत
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मराठी माणसांवर काय संकट आलं आहे हे त्यांना कळलं आहे. मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातील इतर शहर असो तिथे काय परिस्थिती आहे आणि तिथे काय प्रकारचे राजकारण सुरु आहे हे दिसत आहे. आता महाराष्ट्र किंवा निवडणूका अशा परिस्थितीमध्ये येऊन उभ्या आहेत की आता जर आम्ही एकत्र आलो नाही तर महाराष्ट्र आम्हाला कधीच माफ करणार नाही. ही परिस्थिती MMR रिजनवर येऊन ठेपली आहे. मी मुद्दाम MMR चा उल्लेख करत असल्याचे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “खरं तर, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.” असे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले