Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर, भारत रशियन तेल आयातीत लक्षणीय घट करण्याची शक्यता आहे. येत्या काळात रशियन तेलाचा पुरवठा सध्याच्या पातळीपेक्षा ५०% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 12:57 PM
India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?(फोटो सौजन्य - Instagram)

India-US Trade Deal: ट्रम्पच्या आदेशानंतर जागतिक तेल बाजारावर भारत-अमेरिका कराराचा मोठा परिणाम होणार?(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराचा मोठा परिणाम 
  • करारामुळे रशियन तेल आयात कमी होण्याची शक्यता
  • नायरा एनर्जी सोडून, इतर रिफायनरीज खरेदी मर्यादित करणार 
 

India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील अलिकडच्या व्यापार करारामुळे जागतिक तेल बाजाराची गतिशीलता पूर्णपणे बदलली आहे. अमेरिका-भारत व्यापार करारामुळे (India-US trade deal) रशियन तेल आयात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशानंतर, भारत देश रशियन तेल आयातीत लक्षणीय घट करण्याची शक्यता आहे. विशेष तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की येत्या काळात रशियन तेलाचा पुरवठा सध्याच्या पातळीपेक्षा ५०% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर, भारत रशियन तेलाचा सर्वांत मोठा खरेदीदार बनला, परंतु आता हा आलेख खाली येत असल्याचे दिसून येत आहे. आता, या करारानंतर रिफायनरीज जरी थांबल्या असल्या तरी नवीन रशियन ऑर्डरवर, ऊर्जा सुरक्षेवर सर्वांचे लक्ष आहे.

Anil Ambani ED Investigation: अंबानी दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; ED ने अनिल आणि टीना अंबानींना बजावले समन्स

सिंगापूर स्थित सल्लागार कंपनी वांडा इन्साइट्सच्या संस्थापक वंदना हरी यांच्या मते, अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचे एकूण आर्थिक फायदे रशियन तेलावरील सवलतीपेक्षा खूपच जास्त असतील, महणूनच भारत या धोरणात्मक बदलाचा पाठपुरावा करत आहे. अमेरिकेच्या आदेशानंतर, भारतीय तेल रिफायनरीजनी सध्या नवीन स्पॉट कार्गो खरेदी थांबवली आहेत. तसेच, विराम मोड ऑन केला असून सरकारी आणि खाजगी रिफायनरीजनी नवीन ऑर्डर देणे थांबवले आहे, जरी प्री-बुकिंग केलेल्या कार्गोची डिलिव्हरी घेतली जाईल, असे सांगितले आहे. याव्यातरिक्त, नायरा एनर्जी मात्र अपवाद आहे. रोझनेफ्ट-समर्थित नायरा एनर्जी तांत्रिक कारणांमुळे इतर स्रोतांकडून तेल मिळवू शकत नसल्यामुळे दररोज अंदाजे ४००,००० बॅलर खरेदी करणे सुरू ठेवू शकते.

Indian Mutual Fund Market: गुंतवणूकदारांचा कल बदलला? इक्विटी कमी, सोन्याकडे वाढता कल

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने जारी केलेल्या कार्यकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताने रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल आयात थांबवण्यास वचनबद्धता दर्शविली आहे. जर भारताने ही खरेदी पुन्हा सुरू केली, तर सर्व भारतीय वस्तूंवर अमेरिकन टॅरिफ अर्थात अतिरिक्त आयात शुल्क वाढवण्यात येऊ शकते. भारताची ऊर्जा सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही आमच्या आयात स्रोतांमध्ये विविधता आणत राहू, असेही व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

Web Title: Us india trade deal likely to reduce russian oil imports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • crude oil
  • Donald Trump
  • India-US trade deal

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 
2

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 

US-India Trade: भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा! मोठ्या करारापूर्वी ट्रम्प यांची मोठी खेळी; ‘या’ 4 भारतीय कंपन्यांना ग्रीन सिग्नल
3

US-India Trade: भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा! मोठ्या करारापूर्वी ट्रम्प यांची मोठी खेळी; ‘या’ 4 भारतीय कंपन्यांना ग्रीन सिग्नल

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम
4

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.