Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील बालमृत्यूंकडे दुर्लक्ष का? सरकारने या प्रश्नाकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे

कोरोनामुळे अन्य समस्यांकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून राज्याच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेवकांसह अन्य कर्मचारी वर्ग कोरोनाच्या कामांत गुंतला आहे. शाळा, अंगणवाड्या, बालवाडया भरत नसल्याने मुले, गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण आहार मिळत नाही.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 11, 2021 | 09:04 AM
राज्यातील बालमृत्यूंकडे दुर्लक्ष का? सरकारने या प्रश्नाकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे
Follow Us
Close
Follow Us:

एकतर कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेळे. ९७ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले. त्यातच महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यायाने लोक काटकसर करायला लागले. त्यात सर्वाधिक दुर्लक्ष होते, ते महिलांकडे आणि बालकांकडे. आजार अंगावर काढण्याकडे कल वाढतो. कुपोषण, अंधश्रद्धा, उत्पन्नात घट आदी कारणांमुळे मग बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.

डॉ. अभय बंग यांच्यापासून अनेकांनी कोवळी पानगळसारखे पुस्तके बालमृत्यू आणि त्यावरच्या उपाययोजनांवरची लिहिली. अनेक समित्यांनी अहवाल दिले. सरकारने उपाययोजना केल्या; परंतु त्या कागदावरच राहिल्या. आता राज्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांमागे धावत असल्यामुळे आदिवासी बालकांच्या आरोग्याचा मुद्दा आता पुरता टांगणीला लागला आहे.

[read_also content=”विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का? https://www.navarashtra.com/latest-news/mamatas-appeal-to-the-chief-minister-of-the-opposition-to-unite-will-this-appeal-to-them-nrvb-140795.html”]

ठाणे, पुणे, जळगाव व गोंदिया जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त बालमृत्यू झाले आहेत. नंदुरबार, नगर, अमरावती, धुळे आदी जिल्ह्यातील आदिवासी भागातील बालआरोग्याच्या समस्या गंभीरच आहेत. पावसाळ्यात १६ आदिवासी जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न अधिकच गंभीर होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आदिवासी जिल्ह्यात ८९ हजार १५१ तीव्र कुपोषित बालकांची संख्या असून २०२०-२१ मध्ये मार्च अखेरीस सहा हजार ७१८ बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा आढावा घेण्यात आला.

जळगावसाख्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या कमी असताना आणि चाळीसगावसारखा भाग वगळता उर्वरित जिल्हा समृद्ध शेतीचा असतानाही तिथे बालमृत्यूचे प्रमाण वाढणे हे चिंताजनक आहे. गर्भवती महिलांना ४०० रुपये रोख व ४०० रुपयांची औषधे असे ८०० रुपये मातृत्व अनुदान मिळत असते; मात्र मार्च २०२१ अखेर ९५ हजार ८४८ पात्र गर्भवती महिलांपैकी केवळ ५४ हजार १०४ महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. याचा अर्थ ४१ हजार गर्भवती पहिला अन्नदानापासून वंचित आहेत.

कोरोनात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतल्यामुळे बालकांचे लसीकरणही योग्य प्रकारे होऊ शकत नसल्याने बालमृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. ‘टाटा समाज संस्थे’ने आदिवासी भागातील बाल आरोग्यावर नुकताच एक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. मेळघाटमध्ये कमी वजनाच्या बालकांची मोठी समस्या असल्याचे त्यात नमूद केले आहे. याचा अर्थ तिथे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात जवळपास ९७ हजार अंगणवाड्या असून कोरोनामुळे त्या बंद आहेत. याचा मोठा फटका शून्य ते सहा वयोगटाच्या लाखो बालकांना बसत आहे.

[read_also content=”शेती समद्धी हीच काळाची गरज? बऱ्याच प्रश्नांचा तिढा अजून सुटणे बाकी असून यावर काळ हाच रामबाण उपाय आहे https://www.navarashtra.com/latest-news/is-this-the-need-of-the-hour-for-agricultural-prosperity-many-questions-remain-unresolved-and-time-is-the-panacea-nrvb-140363.html”]

या अंगणवाड्यांमधून जवळपास ७३ लाख बालकांच्या पोषण आहारापासून आरोग्य तपासणीचे विविध उपक्रम अंगणवाडी सेविका राबवत असतात. कमी वजनाच्या, कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची माहिती घेऊन उपचारांची दिशा निश्चित होते; परंतु अंगणवाड्याच बंद असल्याने उपचाराची दिशाच बंद झाल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार १६ आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे आरोग्य, कुपोषण, बालमृत्यू तसेच कमी वजनाच्या बालकांच्या जन्माच्या मुद्द्यांसह नवसंजीवन क्षेत्रातील उपाययोजना राबविण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक गाभा समिती नियुक्‍त करण्यात आली आहे.

Why ignore child mortality in the maharashtra state The government needs to pay serious attention to this issue

Web Title: Why ignore child mortality in the maharashtra state the government needs to pay serious attention to this issue nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2021 | 09:04 AM

Topics:  

  • maharashtra state
  • pay

संबंधित बातम्या

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला
1

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला

Tukdebandi Act: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! तुकडेबंदी कायद्यामुळे 60 लाख कुटुंबांना मोठा दिलासा; अडकलेले जमीन व्यवहार सुटणार
2

Tukdebandi Act: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! तुकडेबंदी कायद्यामुळे 60 लाख कुटुंबांना मोठा दिलासा; अडकलेले जमीन व्यवहार सुटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.