Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्यानंतर तरी केंद्राला जाग येऊन अम्फोटेरीसीन-बी औषध मिळेल का ? अतुल लोंढे यांचा प्रश्न

कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. पहिले रेमडेसीवीरचा (vaccination of Remedesivir) घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार (the central government mismanagement) चव्हाट्यावर आला आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 03, 2021 | 05:05 PM
नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्यानंतर तरी केंद्राला जाग येऊन अम्फोटेरीसीन-बी औषध मिळेल का ? अतुल लोंढे यांचा प्रश्न
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai).  कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रुप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. पहिले रेमडेसीवीरचा (vaccination of Remedesivir) घोळ घातला त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार (the central government mismanagement) चव्हाट्यावर आला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे (high courts in the country as well as the Supreme Court) ओढले.

नागपूर खंडपीठानेही अम्फोटेरीसीन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. म्युकरमायकोसीसच्या आजाराने नागपुरमध्ये लोक मरत आहेत, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध का करुन द्या असे सुनावले. औषधांअभावी लोक तडफडून मरत आहेत तरीही मोदींना पाझर फुटत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

[read_also content=”मुंबई/ परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा समूह माध्यमांतून वाढतोय दबाव https://www.navarashtra.com/latest-news/opposition-groups-called-for-the-resignation-of-transport-minister-anil-parab-nrat-137379.html”]

अत्यंत बेजबाबदार व बेफिकीरपणाचे लक्षण
मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसीस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या अम्फोटेरीसीन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यावरून नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले पण मोदी सरकारवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. कोर्टात फक्त तोंडी माहिती देता, वरून हे कोर्टाचे काम नाही असे कोर्टालाच सांगता हे अत्यंत बेजबाबदार व बेफिकीरपणाचे लक्षण आहे.

मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत
नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, किमान त्याचे भान ठेवून तरी नागपूरच्या जनतेला कोरोना संकटकाळात योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष देतील अशी नागपुरकरांची अपेक्षा होती पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत, असा सवाल जनता विचारू लागली आहे. औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे या जबाबदारीतून पळ काढू नका. अम्फोटेरीसीन-बी औषध नागपूरला उपलब्ध करुन द्या, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

Web Title: Will the center wake up and get amphotericin b medicine even after the nagpur bench pulls tashree question by atul londhe nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2021 | 05:05 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Mucormycosis
  • narendra modi
  • prime minister
  • Supreme Court
  • केंद्र सरकार

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
4

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.