कोरोना संकटामुळे २०२० मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्या शुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.
#पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला.@zeestudiosने पांडू चित्रपटाची annoucement करणं हे निर्माते,प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे! या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडे पाऊले वळवली आहेत ही खूप positive गोष्ट वाटते! आपली इंडस्ट्री 2021 गाजवायला सज्ज आहे! pic.twitter.com/asivS6GWPM
— दिपक राणे – Deepak Rane (@Deerane) January 25, 2021
आज सकाळीच एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठं प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली. झी स्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरंच प्रदर्शित होणारं आहे. त्यावर निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
[read_also content=”कतरिना कपूर…‘रणबीर तूम कहा हो?’ असं म्हणत सलमान खानकडून कतरिनाचा नॅशनल टेलिव्हिजनवर पुन्हा अपमान, हे ऐकताच सगळेच झाले हैराण https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/salman-khan-insulted-katrina-kaif-many-times-nrst-81411/”]
निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झी स्टुडीओजने पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडे पाऊलं वळवली आहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट वाटते. आपली इंडस्ट्री २०२१ गाजवायला सज्ज आहे.”
[read_also content=”https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/kareena-kapoor-yoga-poses-with-baby-bump-nrst-81466/ https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/kareena-kapoor-yoga-poses-with-baby-bump-nrst-81466/”]
सर्वांनाच आशा लागून राहीली आहे ती सिनेमांच्या हाऊसफुल्ल पाट्यांची. आता पांडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात शंकाचं नाही.