भारतातील ४ पैकी एका व्यक्तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज होण्याचा धोका
भारत, सप्टेंबर २०२५: दरवर्षी जगभरात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज (सीव्हीडी)मुळे जवळपास १८ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होतो, जेथे भारतात याचे प्रमाण एक-पंचमांश आहे1, जे सर्व कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त आहे. तरीही यासाठी कारणीभूत असलेल्या अनुवांशिक जोखीम घटकाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते.2,3 अंदाज आहे की भारतातील जवळपास २५ टक्के व्यक्तींना एलीव्हेटेड लिपोप्रोटीन(ए) किंवा एलपी(ए) आहे, पण क्वचित चाचणी केली जाते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्याच्या धोरणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
जागतिक हृदय दिनापूर्वी (२९ सप्टेंबर) ग्लोबल हार्ट हब आणि नोवार्टिस यांनी माहितीपूर्ण मीडिया वेबिनार ‘इण्ट्रोड्युसिंग द लिटर (ए) विथ बिग कॉन्सीक्वेन्सेस्’साठी आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा तज्ञांना आमंत्रित केले, जेथे महत्त्वपूर्ण, निदान न होणारी अंतर्गत स्थिती म्हणून एलीव्हेटेड एलपी(ए)ला प्रकाशझोतात आणण्यात आले. या स्थितीमुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक यांसारख्या कार्डिओव्हॅस्कुलर डिसीजचा धोका वाढतो.
नोवार्टिसने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्पतींनुसार, आशिया पॅसिफिक व मध्य पूर्व प्रांतामध्ये तीनपैकी दोन व्यक्ती (६६ टक्के) नियमित हृदय चाचणी चुकवतात, तर जवळपास निम्म्या (४५ टक्के) व्यक्तींना अनुवांशिकता हृदयसंबंधित आजारासाठी धोकादायक घटक असल्याचे माहित नाही. एलपी(ए)बाबत जागरूकता देखील कमी आहे, जेथे फक्त २२ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की त्यांनी बायोमार्करसाठी चाचणीबाबत ऐकले होते, तर फक्त ७ टक्के प्रतिसादकांनी ही चाचणी केली होती.
”भारतात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि एलीव्हेटेड एलपी(ए) सारख्या जोखीम घटकांबाबत जागरूकता महत्त्वाची आहे,” असे भारतातील अपोलो हॉस्पिटल्सचे कार्डिओलॉजीचे संचालक डॉ. ए. श्रीनिवास कुमार म्हणाले. ”विशेषत: दक्षिण आशियाई प्रांत असुरक्षित आहे. खरेतर, भारतातील ३४ टक्के अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोमने पीडित रूग्णांना उच्च एलपी(ए) आहे.8 यासोबत मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब असल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींना लवकर ओळखण्यासाठी आणि टाळता येऊ शकणाऱ्या कार्डियक घटनांना प्रतिबंध करण्यास मदत करण्यासाठी एलपी(ए) चाचणी आवश्यक आहे.”
”भारतातील अनेक व्यक्तींना माहित नाही की, साध्या रक्तचाचणीमधून देखील एलीव्हेटेड एलपी(ए)शी संबंधित अनुवांशिक धोक्याचे निदान होऊ शकते,” असे हार्ट हेल्थ इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक राम खंडेलवाल म्हणाले. ”जागरूकतेचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणे आणि देशभरातील समुदायांना माहितीपूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे व्यक्तींनी फक्त मोठी कार्डियक घटना घडल्यानंतर चाचणी करण्याचा विचार न करता लवकर चाचणी करणे हृदयाच्या आरोग्यासाठी नैसर्गिकपणे आवश्यक बनते.”एलीव्हेटेड लिपोप्रोटीन(ए) किंवा एलपी(ए) या अंतर्गत स्थितीमुळे सीव्हीडीचा धोका वाढतो, जेथे भारतातील ४ पैकी एका व्यक्तीला धोका आहे, तरीही क्वचित चाचणी केली जाते.
आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वमध्ये केलेल्या नवीन सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, ६६ टक्के व्यक्ती नियमित हृदय तपासणी चुकवतात आणि जवळपास निम्म्या व्यक्तींना हृदयसंबंधित आजार होण्यासाठी अनुवांशिकता कारणीभूत असल्याबाबत माहित नाही.
तज्ञांनी ग्राहकांना कार्डिओव्हॅस्कुलर धोरणांमध्ये एलपी(ए)ला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे जागरूकतेसंदर्भातील तफावत दूर होईल आणि चाचणी व केअर सेवा समप्रमाणत उपलब्ध होतील.
”एलपी(ए)साठी चाचणी करणे हार्ट अटॅकला प्रतिबंध करण्यासाठी आणि जीवन वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे नोवार्टिस इंडियाचे देशातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमिताभ दुबे म्हणाले. ”नोवार्टिसमध्ये आम्ही तीन दशकांपासून अत्याधुनिक संशोधनाला चालना देत आहोत, तसेच रूग्णांना परिवर्तनात्मक थेरपी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे भारतातील जोखीम असलेले लाखो व्यक्ती त्यांच्या हृदयाचे आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय पाऊल उचलू शकतात.”
रूग्णांपासून धोरणापर्यंत: जगभरात कृतीसाठी आवाहन
रूग्णाचा दृष्टिकोन: वयाच्या ३३व्या वर्षी हार्ट अटॅकमधून वाचलेल्या राम खंडेलवालने सांगितले की, या अनुभवामधून त्याला भारतातील पहिला हार्ट पेशंट सपोर्ट ग्रुप हार्ट हेल्थ इंडिया फाऊंडेशनसाठी समर्थनीय काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या सदस्यांमध्ये एलीव्हेटेड एलपी(ए)च्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या त्याच्या प्रयत्नाला चालना मिळाली.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील कार्डिओ-मेटाबोलिक मेडिसीनमध्ये तज्ञ प्रो. गेराल्ड वॉट्स यांनी एलीव्हेटेड एलपी(ए) मागील अनुवांशिक शास्त्र आणि हृदयाच्या आरोग्यावरील या स्थितीचा प्रभाव याचे स्पष्टीकरण केले.
एफएच युरोप फाउंडेशन (एफएचईएफ)च्या एलपी(ए) इंटरनॅशनल टास्कफोर्सच्या वरिष्ठ धोरण सल्लागार/प्रकल्प प्रमुख निकोला बेडलिंग्टन यांनी धोरणकर्त्यांना गंभीर काळजी घेण्यामधील तफावत दूर करण्यासाठी राष्ट्रीय सीव्हीडी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एलपी(ए) चाचणी समाविष्ट करण्याचे आवाहन केले. याला पाठिंबा देत मोनाश युनिव्हर्सिटीच्या आरोग्य अर्थशास्त्राच्या प्राध्यापक प्रो. झानफिना अडेमी; एलपी(ए) इंटरनॅशनल टास्क फोर्स, एफएच युरोप फाउंडेशन यांनी एलपी(ए) चाचणीची किफायतशीपण आणि प्रदेशातील आरोग्य यंत्रणा व समाजावर त्याचा आर्थिक परिणाम यांना प्रकाशझोतात आणले.
असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’
भारत, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वमधील तज्ञांनी (भारतातील अपोलो हॉस्सिपटल्सचे डॉ. ए. श्रीनिवास कुमार आणि गॅचोन युनिव्हर्सिटी गिल मेडिकल सेंटरमधील प्रो. यंगवू जँग यांच्यासह) एलीव्हेटेड एलपी(ए)चे निदान व व्यवस्थापनांमधील आव्हाने आणि त्यासाठी चाचणी करण्याचे संभाव्य आर्थिक फायदे यांबाबत चर्चा केली. आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्व प्रदेशात एलपी(ए) चाचणीचा विस्तार करण्यासाठी सहाय्यक धोरणांसह आरोग्य यंत्रणेमध्ये एलीव्हेटेड एलपी(ए)चे निदान आणि व्यवस्थापन अंतर्भूत करण्यासाठी एकत्रित आवाहन करत वेबिनारचा समारोप झाला.