सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन
दैनंदिन आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, सतत जंक फूडचे सेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे तणावपूर्ण जीवचनशैली जगताना शरीराची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. काहींना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याची सवय असते, तर काहींना कॉफी किंवा ग्रीन टी पिण्याची सवय असते. पण सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी काळ्या मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. काळे मनुके आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात नियमित मूठभर काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामध्ये असलेले घटक शरीर कायमच निरोगी आणि मजबूत ठेवतात. काळ्या मनुक्यांमध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर मोठ्या आढळून येते. त्यामुळे मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे थकवा, अशक्तपणा कमी होतो. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठून उपाशी पोटी काळ्या मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याच्या सेवनामुळे शरीर आतून स्वच्छ होते.
बऱ्याचदा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशावेळी आहारात लोहयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. नियमित मूठभर काळे मनुके खाल्ल्यास शरीरात वाढलेला अशक्तपणा आणि थकवा कमी होतो. याशिवाय रक्ताची कमतरता दूर होते. शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. हे पाणी शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
सतत तिखट, तेलकट किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांमुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. अशावेळी लिव्हरमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. यामुळे लिव्हर आतून स्वच्छ होते आणि पचनक्रिया सुधारते.
चुकीच्या वेळी जेवण, सतत तिखट तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. यामुळे पोटात वाढलेला गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांमधील हालचाल सुलभ करतात.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि बोरॉन सारख्या खनिजांमुळे हाडांची ताकद वाढते आणि शरीरातील हाडे मजबूत राहतात.
मनुके भिजवून पाणी पिण्याचे फायदे:
मनुकामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करते आणि आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. मनुकामध्ये लोह आणि तांबे यांसारखी खनिजे असतात, जी रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अशक्तपणा दूर करतात.
मनुक्याचे पाणी कसे बनवायचे?
रात्री मुठभर (सुमारे 15-20) मनुके नीट धुवा.एका ग्लास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी कोमट करून प्या आणि मनुका चावून खा.