10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा
आपल्या या पृथ्वीवर अनेक देश अस्तित्वात आहेत. प्रत्येक देशाची आपली अशी काही खासियत आणि तिथले विशेष नियम आहेत. त्यातच आता आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही देशांविषयी माहिती सांगत आहोत जिथे खाण्याबाबत खास नियम बनवण्यात आले आहेत. हे नियम इतके विचित्र आणि कठोर आहेत की त्याविषयी वाचूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का मिळेल. अनेक देश तर असे आहेत ज्यांना शाकाहारी शब्दाचा अर्थही माहिती नाही. तर एक असा देशही आहे जो ९ वर्षांपासून शाकाहारी उत्सव साजरा करतो, ज्यामध्ये मांसाहारी लोकही शाकाहारी अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात. चला आता आजच्या या यादीत कोणते देश सामील आहेत आणि त्यांचे काय नियम आहेत याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया.
फ्रांस
माहितीनुसार काही फ्रेंच शाळांमध्ये मांस वाढणे फार महत्त्वाचे मानले जाते मात्र इथे शाकाहारी अन्नपदार्थांनाही इतके महत्त्व दिले जात नाही. अशात विचार करा जर एखाद्या मुलगा अथवा मुलगी शाकाहारी असेल तर त्याच्या टिफिनचे किती हाल होत असतील.
इटली
२०१६ मध्ये एका नेत्याने एक विचित्र कायदा बनवण्याचा प्रयत्न केला होता ज्यानुसार, जर कोणते पालक आपल्या मुलांना व्हेगन (पूर्णपणे शाकाहारी) बनवण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना जेल होऊ शकते, कारण ते ‘आरोग्यासाठी धोकादायक’ आहे असे त्यांचे मत! मात्र सुदैवाने, हा कायदा मंजूर झाला नाही.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया एक असे ठिकाण आहे जिथे शाकाहारी हा शब्द फारसा ऐकायला मिळत नाही. लोकांना असं वाटत की शाकाहारीचा अर्थ फक्त निरोगी आहार असा आहे. इथले अधिकतर हॉटेल्स हे मांसाहारी जेवण सर्व्ह करतात. इथे तुम्हाला व्हेज हॉटेल मिळणं फार कठीण आहे. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला विशेषतः तुम्हाला कोणत्या गोष्टी नको आहेत ते सांगावं लागेल.
स्वीडन
इथे काही देशांतर्गत विमान फ्लाइट्समध्ये ‘व्हेज फूड डिफॉल्ट आहे’. याचाच अर्थ इथे मांसाहारी आहार नाही, तुम्ही काहीही निवडले तरी तुम्हाला शाकाहारी जेवणच दिले जाईल.
पोर्तुगाल
पोर्तुगालमध्ये २०१७ साली, एक नवा कायदा बनवण्यात आला ज्यानुसार प्रत्येक सरकारी शाळा, रुग्णालय आणि रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवण वाढले पाहिजे असा आदेश देण्यात आला.
अर्जेंटिना
हा देश मांसाहारी प्रेमींसाठी ओळखला जातो. इथे अनेक रेस्टॉरंट्स आहेत जिथे शाकाहारी जेवण मिळत नाही, तुम्ही आग्रह धरला तरी तुम्हाला शाकाहारी जेवण दिले जाणार नाही, उलट तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले जाईल.
थायलँड
थायलँडमध्ये दरवर्षी एक शाकाहारी महोत्सव आयोजित केला जातो. हा महोत्वसव ९ दिवसांचा असतो ज्यात मांसाहार प्रेमीदेखील शाकाहारी अन्नाचा आनंद लुटतात. मात्र भारतात जसे हिरव्या ठिपक्याला शाकाहारी मानले जाते तसे इथे पिवळ्या ध्वजाला शाकाहारी मानले जाते. यात फिश सॉस देखील असू शकतो.