फोटो सौजन्य: Youtube)
प्रेम म्हटलं की त्यात वाद-विवाद भांडण ही येतातच. प्रेम हे करणं सोपं असलं तरी ते नातं टिकवून ठेवणं त्याहून अधिक कठीण. लग्नानंतर अनेकदा जोडप्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद सुरु होतात आणि मग हे वाद मोठ्या भांडणात रूपांतरित होतात. नातेसंबंधांमधील ही कटुता वाढली तर अनेकदा ब्रेकअप किंवा घटस्फोट होण्याची शक्यता असते. अनेकदा शुल्लक गैरसमजामुळेही नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत दोन्ही जोडीदार नैराश्यात जातात किंवा एकमेकांशी भांडून एकमेकांपासून वेगळे होण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला गमवायचे नसेल आणि आयुष्यभर त्याची सोबत हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असा धबधबा सांगणार आहोत जो नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी चमत्कारिक मानला जातो. इथे जोडप्याने एकत्र आंघोळ करताच त्यांच्यातील दुरावा कमी होतो अशी मान्यता आहे. चला या धबधब्याविषयी सविस्तर जाणून घ्या.
आजही या पर्वतांवर आहे देवांचा वास; भक्तांना होते त्यांच्या उपस्थितीची जाणीव
या तलावाविषयीची माहिती एका इंस्टाग्राम ब्लॉगरने सर्वांसोबत शेअर केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा धबधबा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात वसला असून त्याचे नाव भदैया कुंड असे आहे. या धबधब्याला प्रेम वाढणारा धबधबा असेही म्हटले जाते. या धबधब्यात आंघोळ करणारे कोणतेही प्रेमी जोडपे कायमचे एकमेकांचे बनतात असे म्हटले जाते. एवढेच काय तर, इथे आंघोळ केल्यास आयुष्यात कोणतीही मोठी समस्या आली तरी तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते तुटत नाही आणि तसेच टिकून राहते.
धबधब्याची कथा
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमाला कंटाळलेल्या दोन प्रेमींनी इथे एकदा तपश्चर्या केली होती, ज्यानंतर त्यांना वरदान मिळाले की, आजपासून जो कोणी प्रियकर या तलावात स्नान करेल त्याला त्यांच्या प्रेमात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तेव्हापासून अशी मान्यता आहे की, प्रेमाला त्रासलेले जोडप्यांनी जर इथे येऊन स्नान केले तर त्यांच्या नात्यातील सर्व कटुता दूर होते आणि त्यांचे प्रेम कायमचे अमर होते.
शिवपुरी येथील या धबधब्यात खडकांमधून पाणी येते. धबधब्यात फक्त पावसाळ्यातच पाणी दिसते, उर्वरित काळात येथे पाण्याची कमतरता असते. येथील पाण्याला प्रेमाचे पाणी असे देखील म्हटले जाते. इतकेच काय तर इथले पाणी परदेशात देखील पाठवले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या जोडप्याने हे पाणी प्यायले तर त्यांच्यात कधीही भांडणं होत नाहीत.
ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया
धबधब्याला कसे जायचे?