Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

वजन कमी करण्यासाठी जिम आणि कठीण डाएटच गरजेचा आहे, असं नाही. एका १८ वर्षीय तरुणीने घरच्या घरी वर्कआउट, संतुलित आहार आणि नियमित जीवनशैलीच्या मदतीने दोन वर्षांत तब्बल १८ किलो वजन कमी केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 08:15 PM
Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • २ वर्षांत ८५ किलोवरून ६७ किलोपर्यंत वजन कमी केलं.
  • प्रोसेस्ड आणि तेलकट पदार्थ टाळून प्रोटीनयुक्त घरगुती आहारावर भर दिला.
  • नियमित वर्कआउटसोबत पुरेसं पाणी, झोप आणि विश्रांतीला महत्त्व दिलं.
वजन कमी करताना सुरुवातीच्या काळात अनेकांमध्ये फार जोश असतो. पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसा हा उत्साह हळूहळू कमी होऊ लागते. हेच कारण आहे की, आपल्या फिटनेस जर्नीत अनेकांना अपयश हाती लागते. चुकीची लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे लठ्ठपणाची समस्या अनेकांना उद्भवत आहे. वजन कमी करणं काही सोपं काम नाही पण दृढनिश्चय असेल आणि ध्येय निश्चित असेल तर हळूहळू का होईना पण तुमचे वजन निश्चित कमी होईल. असंच काहीसं एका तरुणीने आपल्या आयुष्यात करुन दाखवलं आहे. जिम न लावताही घरीच तिने २ वर्षांत आपले १८ किलो वजन कमी केले. आपली ही जर्नी शेअर करत तिने रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर फिटनेस सीक्रेट रिव्हिल केलं.

२ वर्षांत १८ किलो वजन कमी

तरुणीने सांगितले की, वेट लाॅस जर्नी सुरु केली तेव्हा तिचे वजन ८५ किलो होते. अभ्यास आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तिला नियमितपणे जिमला जाता येत नव्हते अशात हळूहळू वर्कआउट करुन तिने आपले वजन कमी केले. साधारण दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तरुणीने आपले १८ किलो वजन कमी केले. आता तिचे वजन ८५ हून ६७ वर आले आहे. तिने सांगितले की, यात कोणत्याही शाॅर्टकटचा समावेश नव्हता तर रोज केलेली मेहनत आणि लाईफस्टाईलमध्ये केलेले बदल यामुळे वजन कमी करण्यास तिला मदत झाली.

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

डाएट आणि वर्कआउट प्लॅन

१८ वर्षांच्या या तरुणीने आपल्या त्या काही सवयी शेअर केल्या ज्यामुळे तिला वजन कमी करण्यास मदत झाली. तिने सर्वात आधी साखरेयुक्त गोड साॅफ्ट ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड आणि बाजारातील तेलकट पदार्थ खाणे टाळले. या वेट लाॅस जर्नीत ती घरीच आपल्यासाठी हेल्दी जेवण बनवू लागली. तिने आपल्या आहारात अंडी, पनीर, मसूर, चणे आणि हरभरा यांचा समावेश केला. तिने फार स्ट्रीक्ट डाएट फाॅलो केला नाही तर फक्त जेवणाची मात्रा मर्यादित केली, अतिसेवन टाळले.

कोणता वर्कआउट रुटीन फाॅलो केला?

तरुणीने सांगितले की, ती रोज सकाळी १६००० ते १७०० कॅलरिज घेत असे आणि कमीतकमी १०० ग्रॅम प्रोटीन्सचा आहारात समावेश करत असे. तिने खास डाएट फाॅलो केला नाही तर रोज घरी बनवलेल्या जेवणाचे ती सेवन करायची. आपल्या आवडीचे पदार्थ जसे की, पनीर, डाळ, अंडी यातून तिचा प्रथिनांचा साठा पूर्ण व्हायचा.

डेसी वर्कआउट रुटीन

  • सोमवार- लेग्स
  • मंगळवार- चेस्ट, शोल्डर आणि ट्राइसेप्स
  • बुधवार- एब्स आणि कार्डियो
  • गुरुवार- लेग्स
  • शुक्रवार- बॅक आणि बाइसेप्स
  • शनिवार- एब्स आणि कार्डियो
  • रविवार- आराम
जास्त पाणी पिण्याची सवय

तरुणीने सांगितले की, आपल्या आहारात तिने साधारण ३ लीटर पाण्याचा समावेश केला. हळूहळू तिला इतक्या प्रमाणाची सवय झाली. पाण्याचे सेवन पोट भरुन ठेवण्यास आणि शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते.

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

पुरेशी झोप आणि विश्रांती

तरुणीची मान्यता होती की, वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट आणि व्यायाम करणे महत्त्वाचे नाही तरी पुरेशी झोप आणि विश्रांतीही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. शरीराला रिकव्हर होण्यासाठी थोड्या आरामाचीही गरज असते.

Web Title: 18 year old girl loses 18 kg in 2 years without gym weight loss journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lose weight

संबंधित बातम्या

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
1

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
3

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.