Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

Post Diwali Diet Healthy Vegetables and Fruits For Weight Loss: दिवाळीत फराळ,चमचमीत जेवण तसेच विविध प्रकारचे मिठाई खाऊन वजन झपाट्याने वाढते. परंतु, तुम्हालाही दिवाळीनंतर वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 12:05 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत गोडधोड खाऊन वाढलं वजन?
  • वजन नियंत्रणासाठी खा ‘या’ गोष्टी
  • फॉलो करा सोप्या डाएट टिप्स
दिवाळीचा सण म्हटलं की फराळ, मिठाई आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी आलीच. मात्र, सणाच्या उत्साहात गोडधोड आणि तेलकट पदार्थांवर ताव मारताना अनेकजण आपल्या आरोग्याकडे आणि वजनाकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम सण संपल्यानंतर पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, सुस्ती येणे आणि वजन वाढणे यांसारख्या स्वरूपात दिसून येतो. त्यामुळे सणानंतर शरीराला पुन्हा फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणे गरजेचे आहे.

पण त्यासाठी उपाशी राहण्याची किंवा डाएट करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थ आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरु शकते. मग दिवाळीनंतर वजन कमी करण्यासाठी दररोजच्या रुटीनमध्यो कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या. (Post Diwali Weight Loss Tips)

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

दिवाळीनंतर शरीराला फिट ठेवण्यासाठी काय खावे?

फायबरयुक्त फळे खा

दिवाळीनंतर तुमच्या आहारात सफरचंद, पेरू, पपई, संत्री आणि नाशपाती यांसारख्या फळांचा समावेश करा. यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा

पालक, दुधी भोपळा, दोडका, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या दररोज खा. या भाज्यांमधून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. तुमच्या रोजच्या आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

दही आणि ताक यांचे सेवन करा

पचनासाठी दही आणि ताक हे चांगले पर्याय आहेत. त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात एक वाटी ताजे दही किंवा ताकाचा समावेश करु शकता.

भरपूर पाणी प्या

सणासुदीच्या काळात जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याने तुम्हाला जड वाटू शकते. तसेच, यामुळे छातीत जळजळ, अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो. म्हणून, दिवसभर भरपूर पाणी प्या. नारळाचे पाणी आणि साखर नसलेले लिंबाचे पाणी हे देखील चांगले पर्याय आहेत.

प्रथिनेयुक्त पदार्थ खा

शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. आपल्या आहारात डाळी, पनीर, अंडी, चणे, मूग आणि मोड आलेले धान्य यांचा समावेश करा. हे पदार्थ स्नायूंना पोषण देतात. तसेच, तुम्हाला यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते परिणामी अतिप्रमाणात खाणे टाळले जाते.

हलके, घरी बनवलेले जेवण घ्या

दिवाळीनंतर काही दिवस तळलेले पदार्थ, जंक फूड आणि अतिरिक्त साखर टाळा. याऐवजी खिचडी, डाळ-भात, व्हेज सूप आणि मल्टीग्रेन रोटी यांसारखे पर्याय निवडा.

नाश्त्यामध्ये ओट्स खा

नाश्त्यासाठी तुम्ही ओट्स, लापशी, पोहे किंवा व्हेज उपमा खाऊ शकता. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि संतुलित आहार राखण्यास मदत होते.

ग्रीन टी आणि हर्बल पेये प्या

चहा किंवा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. परंतु, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी कोणत्याही पेयाला जादुई उपाय मानू नका.

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Web Title: Post diwali weight loss tips healthy diet foods fruits vegetables pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • healthy food
  • lose weight
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
1

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित
2

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज
3

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?
4

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.