(फोटो सौजन्य: Pinterest)
कधीपासून सुरु होत आहे अमृत उद्यान?
मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य लोकांसाठी 16 ऑगस्ट 2026 पासून ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अमृत उद्यान खुले करण्यात येणार आहे. हे सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असणार आहे. तथापि, लास्ट एंट्रीची वेळ संध्याकाळी ५ वाजताची आहे. सोमवारी मात्र मेंटनेसच्या कारणाने हे उद्यान बंद राहिल.
कोणत्या गेटमधून मिळेल एंट्री?
हे लक्षात घ्या की, अमृत उद्यानात प्रवेशासाठी नॉर्थ ॲव्हेन्यू रोडवरील राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक ३५ वर पोहोचावे लागते. अमृत उद्यानात जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करावे लागेल. यासाठी राष्ट्रपती भवनाच्या visit.rashtrapatibhavan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. मुख्य म्हणजे या तिकिटांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
कोणताही बुकिंग स्लाॅट हा बुकिंग केलेल्या दिवसाच्या एक दिवसाआधी सकाळी १० वाजता बंद होईल. याचाच अर्थ जर तुम्हाला १७ ऑगस्टला उद्यानाला भेट द्यायची असेल तर तर १६ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या आधी तुम्हाला तुम्हाला बुकिंग करावी लागेल. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑफलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही आहे.
अमृत उद्यानात काय पाहायला मिळेल?
नवी दिल्लीतील राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला तुम्हाला विविध प्रकारची सुंदर फुले, आकर्षक कारंजे, हिरवेगार लॅण्डस्केप आणि १५ एकरांवर पसरलेला राष्ट्रीय भवनाचा परिसर पाहायला मिळेल. इथे तुम्हाला १०५ हून अधिक फुलांच्या जाती पाहायला मिळतील.

