Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!

Simple Tips to Improve Digestion: डाळी हा रोजच्या आहारातील प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटकांचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, काही लोकांना तूर डाळ, मसूर डाळ आणि सुके वाटाणे किंवा हिरवे मटार खाल्ल्यानंतर गॅस, पोट फुगणे आणि अस्वस्थता जाणवू शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 25, 2026 | 04:00 PM
Simple Tips to Improve Digestion: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Simple Tips to Improve Digestion: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तूर, मसूर आणि मटारमुळे गॅस होऊ शकतो.
  • डाळ शिजवताना आलं, कढीपत्ता वापरा.
  • डाळ भिजवून पूर्ण मऊ शिजवा.

आपल्या घरी रोजच्या जेवणात डाळ असतेच. वरण भात असो, आमटी असो किंवा डाळीची भाजी, डाळीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. डाळीतून आपल्याला प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम भरपूर मिळतं. पण काही लोकांना डाळ खाल्ली की लगेच त्रास सुरू होतो.

पोट गच्च होणं, गॅस होणं, पोट फुगणं, सारखे ढेकर येणं असा त्रास होतो. ज्यांचं पोट नाजूक असतं त्यांना तर जास्तच त्रास होतो.याचा अर्थ डाळ खाणं बंद करायचं का? अजिबात नाही. डाळ खाण्याची आणि बनवण्याची पद्धत थोडी बदलली तर हा त्रास सहज टाळता येतो. Simple Tips to Improve Digestion:

कोणत्या 3 डाळींमुळे पोटात गॅस होतो?

आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या मते तीन डाळींमुळे जास्त गॅस होतो.  तूर डाळ, मसूर डाळ आणि सुके वाटाणे किंवा हिरवे मटार. यामागे एक सायन्स आहे. या डाळींमध्ये रॅफिनोज आणि स्टॅकिओज नावाची एक प्रकारची शर्करा असते. आपलं लहान आतडं ही शर्करा पचवू शकत नाही.

Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!

मग ही न पचलेली शर्करा मोठ्या आतड्यात जाते. तिथे असलेले बॅक्टेरिया ती पचवायचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच गॅस तयार होतो. त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं आणि अस्वस्थ वाटतं. पण घाबरू नका, योग्य पद्धतीने डाळ शिजवली तर हा त्रास होणार नाही.

गॅस टाळण्यासाठी 4 सोपे

घरगुती उपाय1.

डाळीत कढीपत्ता टाका 
आपण फोडणीत कढीपत्ता टाकतोच. पण डाळ शिजवताना पण कढीपत्त्याची 7-8 पानं टाका. यामुळे डाळीला चव पण छान येते आणि पचायला पण हलकी होते. कढीपत्ता पचन सुधारायला मदत करतो.

थोडी दालचिनी टाका 
दालचिनीचा एक छोटा तुकडा डाळ शिजताना टाका. त्यामुळे डाळीला वास छान येतो दरम्यान पोटातला गॅस कमी होण्यास मदत होते. जास्त प्रमाणात दालचिनी टाकू नका, चिमूटभर टाका.

काळी मिरीचा वापर करा 
काळी मिरीत पायपरीन नावाचा घटक असतो जो पचनासाठी चांगला असतो. डाळीत थोडी काळी मिरी कुटून टाका. पण ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी तिखट कमी वापरा.

आलं किंवा सुंठ टाका 
आलं हे पचनासाठी सगळ्यात भारी आहे. डाळ शिजवताना थोडं किसलेलं आलं किंवा सुंठ पावडर टाका. यामुळे गॅस होत नाही आणि डाळ लवकर पचते.

डाळ बनवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डाळ कधीच डायरेक्ट शिजवू नका. आधी 3-4 तास पाण्यात भिजत ठेवा. मग ते पाणी फेकून द्या आणि नव्या स्वच्छ पाण्यात डाळ शिजवा. यामुळे गॅस करणारे घटक पाण्यातून निघून जातात.

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

दुसरं म्हणजे डाळ नेहमी पूर्ण मऊ शिजवा. कच्ची डाळ पचायला जड जाते. सुरुवातीला कमी प्रमाणात खाऊन बघा, शरीराला कशी वाटते ते बघा. आणि जेवताना घाई करू नका, सावकाश चावून खा.जर हे सगळं करून पण तुम्हाला सारखं पोट फुगणं, जोरात पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा वजन कमी होणं असा त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांना दाखवा. कधी कधी हा त्रास दुसऱ्या पोटाच्या आजारामुळे पण असू शकतो. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.

Web Title: 3 lentils that cause gas 4 simple dal digestion tips rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • lifesytle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव
1

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ
2

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा
3

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा

Chandrapur News: आश्वासनांनंतरही नेरीत विशेष ग्रामसभा रखडली; युवा ग्रामविकास संघटनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा
4

Chandrapur News: आश्वासनांनंतरही नेरीत विशेष ग्रामसभा रखडली; युवा ग्रामविकास संघटनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.