Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव

Nagpur Crime : नागपुरात ३ कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी एका संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट पोलिसांनी उधळला. या प्रकरणातील आग्र्यातील मास्टरमाइंडला अटक करण्यात आली असून, संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 25, 2026 | 03:37 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • इरफानला ओळखतही नाही
  • पार्सलमधून मिळाला मोबाइल क्रमांक
  • स्वतंत्र चौकशीत कटाचा संशय बळावला
Nagpur News : राजस्थानातील एका तेल कंपनीच्या संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधी रुपये उकळण्याच्या कथित कटाचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला. संचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी नागपुरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. तिच्या माध्यमातून कथित बनावट तक्रार दाखल करून संबंधित संचालकाकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील कथित सूत्रधार आदित्य सुरेशचंद्र गुप्ता (३०, रा. आग्रा) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयीन आदेशानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजस्थानातील रतनगढ येथील इरफान अली सलीम तेली (३२) यांची तेल कंपनी आहे.

त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा कट आदित्यने रचला. यासाठी नागपुरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. आदित्यच्या सांगण्यावरून तिने तहसील पोलिस ठाण्यात इरफान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रारंभी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी इरफान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

मात्र, पुढील तपासात संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण मिळाले. आदित्यने इरफानविरुद्ध पुण्यातही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल करून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या प्रकरणात इरफान सध्या कारागृहात आहे. तहसील पोलिसांनी इरफान यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रकरणातील संशयास्पद बाबी उघड होऊ लागल्या.

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

इरफानला ओळखतही नाही

स्वतंत्र चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने इरफान यांना आपण ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच ‘मीका’ या अॅपवर त्यांच्याशी कधीही संवाद साधला नसून, आदित्यच्या सांगण्यावरूनच तक्रार दाखल केल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती उपायुक्त राहुल मदणे यांनी दिली.

त्यानंतर विद्यार्थिनीच्या मोबाइलमधील माहितीची तपासणी करण्यात आली. या तपासातून आदित्यने इरफान यांच्याविरुद्ध कट रचल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. या आधारे पोलिसांनी आदित्यला अटक केली.

पार्सलमधून मिळाला मोबाइल क्रमांक

या प्रकरणातील विद्यार्थिनी मूळची चंद्रपूरची असून, गेल्या तीन वर्षांपासून ती नागपुरात भाड्याच्या खोलीत राहते. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. एका पार्सलच्या माध्यमातून आदित्यला विद्यार्थिनीचा मोबाइल क्रमांक मिळाला.

त्यानंतर दोघांची ओळख झाली. पुढे याच ओळखीचा वापर करून विद्यार्थिनीला तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल मदणे आणि सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, उपनिरीक्षक संदीप भिताळे आणि पोलिस हवालदार धनराज चिंग्वार यांनी केली.

Nagpur News : उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

स्वतंत्र चौकशीत कटाचा संशय बळावला

पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनराज चिंगुवार करीत होते. तक्रारीत नमूद केलेला व्हिडिओ पुरावा जप्त करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थिनीची चौकशी सुरू होती. त्यावेळी तिच्यासोबत आलेला आदित्य वारंवार संभाषणात हस्तक्षेप करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला बाजूला बसवून पोलिसांनी विद्यार्थिनीची स्वतंत्रपणे चौकशी केली. या चौकशीतून प्रकरणातील महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत .

Web Title: Nagpur crime police foil plot scheme to frame a director in a false case to extort 3 crore thwartedcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Extortion Case
  • Marathi News
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर
1

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!
2

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ
3

Mawra Hocane Welcomes Baby Boy: ‘सनम तेरी कसम’ फेम सरू झाली आई! लग्नाच्या दीड वर्षांनी घरी आलं गोंडस बाळ

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा
4

Upasana Kamineni Konidela: दुसऱ्या महिलांना खाली खेचणाऱ्यांनो, सावधान! उपासना कामिनेनींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.