
थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ
हिवाळ्यात प्रवास करणं तुलनेने सोपं असतं. ना प्रखर ऊन, ना थकवा. धार्मिक ठिकाणांचा शांत, पवित्र आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी हा काळ विशेष योग्य ठरतो. जर तुम्हीही यंदाच्या हिवाळ्यात कुटुंबासोबत एखाद्या श्रद्धास्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर खालील चार जागा तुमच्या सहलीला अविस्मरणीय बनवतील.
राम मंदिर, अयोध्या
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे नव्याने बांधलेले राम मंदिर आज देशातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २०२४ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि तेव्हापासून दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रीरामाची जन्मभूमी असल्याने येथेची ऊर्जा अत्यंत दिव्य आणि शांत वाटते. भव्य मंदिर, सुबक नक्षीकाम आणि विशाल परिसर पाहताच मन प्रसन्न होते. दर्शनानंतर सरयू नदीच्या किनारी बसल्यावर मनाला विलक्षण शांतता लाभते. अयोध्या रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचण्यासारखी असल्याने ही कुटुंबीयांसाठी उत्तम ट्रिप ठरते.
गलताजी मंदिर, जयपुर
राजस्थानची राजधानी जयपूर फक्त किल्ले आणि राजवाड्यांसाठीच प्रसिद्ध नाही; येथे अनेक धार्मिक स्थळेसुद्धा आहेत. त्यापैकी अरावली पर्वतरांगांच्या मधोमध वसलेलं गलताजी मंदिर हे निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण आहे. गुलाबी दगडांनी बांधलेलं हे मंदिर पाहताना मन अचंबित होतं. येथे मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या माकडांमुळे याला “बंदर मंदिर” असेही म्हणतात. मंदिरात हनुमानजींसह राम, कृष्ण आणि सूर्य देवांचेही छोटे मंदिर आहेत. जवळच असलेली एक नैसर्गिक कुंड फोटोसाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात येथे वातावरण अधिक सुखद असल्याने कौटुंबिक सहलीसाठी ही जागा आदर्श ठरते.
महाराष्ट्राच्या या हिल स्टेशनला ‘इटली’ म्हटले जाते, पण का? सुंदरता पाहून पर्यटक होतात आकर्षित
नीम करौली धाम (कैंची धाम), नैनीताल
उत्तराखंडमधील नैनीतालजवळ वसलेले नीम करौली धाम आज जगभर प्रसिद्ध आहे. येथे हनुमान भक्त बाबा नीम करौली महाराज यांचे आश्रम आहे. शांत, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या परिसरात पोहोचताच मन हलकं वाटू लागतं. अनेक नामांकित सेलिब्रिटी, उद्योगपती आणि कलाकारही येथे दर्शनासाठी येतात.
हिवाळ्याच्या थंड हवेसोबत डोंगराळ परिसराचा संगम येथे एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतो. येथे राहण्याचीही उत्तम व्यवस्था मिळते. नैनीतालपासून सुमारे ३८ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या गाडीने सहज पोहोचता येते. कुटुंबासोबतची ही सहल मनाला अपार आनंद देते. हिवाळा हा प्रवासासाठी उत्तम काळ आहे आणि त्यातही धार्मिक स्थळांची भेट मन, शरीर आणि विचारांना सकारात्मक दिशा देते. वर दिलेली ही चार ठिकाणे तुम्हाला अध्यात्मिक शांतता, निसर्गसौंदर्य आणि कुटुंबासोबत घालवलेले अमूल्य क्षण हे सर्व एकाच वेळी अनुभवायला देतील.