Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात पाय आणि घोट्याच्या दुखापतींमध्ये 30% वाढ, काय आहेत कारणं

चालताना पाय घसरणे आणि चुकीच्या पादत्राणांच्या निवडीमुळे दुखापतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही नोंद केल्यानंतर आता नक्की कशी काळजी घ्यावी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2025 | 06:51 PM
पावसाळ्यात का वाढतेय घोट्याच्या दुखापतींचे प्रमाण (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यात का वाढतेय घोट्याच्या दुखापतींचे प्रमाण (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या पावसाळ्यात पाय आणि घोट्यासंबंधित वेदनेच्या घटनांमध्ये तीस टक्के वाढ झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली आहे. घोट्याला दुखापत होण्यास कारणीभूत घटकांपैकी निसरडा पृष्ठभाग, खड्डे, खराब रस्ते आणि चुकीच्या पादत्राणांचा वापर तसेच दुचाकी अपघातांचा समावेश आहे.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्याम ठक्कर म्हणाले की, मुसळधार पाऊस आणि ओलसर पृष्ठभागामुळे  पावसाळ्यात बाहेर फिरणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतो. निसरडे रस्ते, ओल्या फरशा, असमान पृष्ठभाग आणि चिखलाचे रस्ते यामुळे पाय घसरण्यासारख्या घटना घडतात, ज्यामुळे अनेकदा पाय आणि घोट्याला दुखापत होते. 

पाय अचानक आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस वळल्यावर घोटा मुरगळतो, ज्यामुळे त्याला आधार देणाऱ्या अस्थिबंधनांवरही ताण येतो. योग्य उपचार न केल्यास, ही वेदनादायक दुखापत गतिशीलता आणि हालचालींवर परिणाम करू शकते. यामुळे रुग्णाला चालण्यासारख्या क्रिया करणे देखील कठीण होईल आणि त्यांना दररोज त्रास होऊ शकतो. म्हणून, वेळीच तज्ज्ञांची मदत घ्या आणि जीवनाची गुणवत्ता सुधारा (फोटो सौजन्य – iStock)

दर महिन्यात होतेय वाढ

निसरडे, खड्डेमय रस्ते आणि अयोग्य पादत्राणांमुळे घोटा मुरगळण्याचे आणि पायाला दुखापत होण्याचे किमान ३ ते ४ प्रकरणं दर महिन्याला आढळून येतात. २५ ते ६५ वयोगटातील लोकांमध्ये पाय आणि घोट्याच्या दुखापतींमध्ये सुमारे ३०% वाढ झाली आहे. सुरुवातीला या दुखापती किरकोळ वाटू शकतात, परंतु तज्ञांकडून त्वरित उपचार न केल्यास त्यामुळे दीर्घकालीन वेदना होऊ शकतात. पादचाऱ्यांना, विशेषतः वृद्धांना आणि ऑफिसला जाणाऱ्यांना, पावसाळ्यात किंवा लगेच नंतर बाहेर पडताना जास्त धोका असतो.

पुरुषांमध्ये वाढतेय मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण, तज्ज्ञांनी सांगितले वेळीच व्हा सावध

गंभीर दुखापतींचे स्वरूप

डॉ. श्याम पुढे म्हणाले, साध्या दुखापतीपासून ते गंभीर फ्रॅक्चरपर्यंत दुखापतींचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलते. आम्ही अशी काही प्रकरणं पाहिली आहेत जिथे तरुणांनाही ओल्या पायऱ्या किंवा निसरड्या रस्त्यावरून घसरल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. 

बहुतेक प्रकरणांमध्ये योग्य विश्रांती आणि उपचाराने रुग्ण बरा होतो , परंतु काही प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात योग्य उपचार न केल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. वारंवार घोट्याच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. हल्ली अशा प्रकरणांमध्ये की होल सर्जरी केली जाते ज्यामध्ये रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदना देखील कमी होतात.  ओपन सर्जरीपेक्षा हे पर्याय चांगले आहेत. उपचार न केल्यास, हे लहान वयातच संधिवातास कारणीभूत ठरते.

कशी घ्याल काळजी

तुमचे रोजच्या वापरातील पादत्राणे अर्थात शूज वापरण्यापूर्वी नीट तपासा आणि ते योग्य स्थितीत असल्याची खात्री करा, उंच टाचांची चप्पल किंवा पायाला पुरेसा आधार न देणारे शूज वापरणे टाळा. त्याऐवजी, घोट्याला आधार देणारे घसरण्यापासून रोखणारे, योग्य मापाचे शूज निवडा. 

पाणी साचलेल्या रस्त्यांवर काळजीपूर्वकरितीने चाला. तज्ज्ञांच्या प्रशिक्षणाखाली सौम्य व्यायाम केल्यास पाय व घोट्याची दुखापत बरी होण्यास मदत होऊ शकते. वयस्कर व्यक्तींनी निसरड्या पृष्ठभागावरुन चालताना वॉकिंग स्टिक किंवा हँडरेल वापरण्याचा विचार करावा असेही डॉ. श्याम यांनी स्पष्ट केले.

Sri Sri Ravi Shankar यांनी दिला Blood Pressure पासून हृदय वाचविण्याचा सोपा उपाय, रोज 5 योगासनं ठेवतील नियंत्रणात

Web Title: 30 percent increase in foot and ankle injuries during monsoon what are the reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Health Updates
  • monsoon care
  • Monsoon News

संबंधित बातम्या

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा
1

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा
2

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा

Today Weather : पुढील तीन तास ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर
3

Today Weather : पुढील तीन तास ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
4

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.