कोलेस्ट्रॉल नियंत्रणाासाठी कोणते ज्युस आहेत उत्तम
आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत चालल्या आहेत, त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागल्याचे दिसून येत आहे. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी केवळ हृदयविकारांचा त्रास निर्माण करत नाही. तर इतर गंभीर आरोग्य समस्यादेखील कारणीभूत ठरू शकते.
पण योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. आम्ही तुम्हाला 5 सर्वोत्तम भाज्यांच्या रसांबद्दल सांगणार आहोत, जे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करून तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतील. डॉक्टर माधव भागवत यांनी 5 भाज्यांच्या रसाबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
टॉमेटोचा रस
टॉमेटोच्या रसामुळे कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात
टोमॅटो केवळ स्वादिष्टच नाही तर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहेत. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे विशेष अँटिऑक्सिडंट आढळते, जे LDL (खराब कोलेस्ट्रॉल) ची पातळी कमी करण्यास मदत करते. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रोज 1 ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
गाजराचा ज्युस
कोलेस्ट्रॉलसाठी गाजराचा ज्युस
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर मानले जाते. गाजरात मोठ्या प्रमाणात विरघळणारे फायबर असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय यात बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे हृदयाच्या नसा मजबूत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. गाजराचा रस रोज प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते
हेदेखील वाचा – कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकतील 5 पदार्थ, आजच खायला करा सुरूवात
पालक ज्युस
पालक ज्युसमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी येईल कमी
पालक हे एक सुपरफूड आहे, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पालकामध्ये ल्युटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते. यासोबतच त्यात नायट्रेट्स असतात, जे रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पालकाचा रस नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.
कारल्याचा ज्युस
कारल्याचा ज्युस ठरेल वरदान
कडू चवीमुळे काही लोकांना आवडत नसले तरी त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या नसा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो
हेदेखील वाचा – नसांमध्ये साचलेले पिवळे फॅटी कोलेस्ट्रॉल होईल झर्रकन कमी, वर्षभर मिळणारे हे फळ खा!
बीट ज्युस
उत्तम ठरेल बीटरूट ज्युस
बीटरूटचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. बीटरूटमध्ये नायट्रेट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शिरा पसरवतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात. याशिवाय, बीटरूटचा रस खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) पातळी वाढविण्यास मदत करतो. यामुळे हृदय तर निरोगी राहतेच शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.