
चुकीच्या सवयींमुळे आयुष्य होतंय त्रासदायक
असे कधी घडले आहे का की एखादी वरवर निरोगी दिसणारी व्यक्ती अचानक गंभीर आजाराने त्रस्त होते आणि त्यावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी कठीण असते? असे होणे खूप सामान्य आहे, कारण अनेक वेळा एखादी व्यक्ती अशा अनेक गोष्टी करत असते, ज्याचा परिणाम त्याच्या शरीरावर फक्त आंतरिकपणे दिसून येतो आणि याची जाणीवही त्यांना नसते.
आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही सवयी आहेत ज्या पहिल्या दृष्टीक्षेपात हानिकारक वाटत नाहीत, परंतु दीर्घकाळात त्या आपल्या आरोग्यास हानी पोहोचवतात. येथे तुम्ही अशा 5 सवयींबद्दल जाणून घेऊ शकता, ज्यांना स्लो पॉयझनदेखील म्हणतात. अनेक अभ्यासातूनही हे सिद्ध झाले आहे आणि याशिवाय आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी आपल्याला याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
मूलभूत शारीरिक क्रिया
शारीरिक हालचाल करणेही बंद झाले आहे
बरेच लोक आता मूलभूत शारीरिक क्रियादेखील करत नाहीत. घरातील कामापासून ते बाहेरच्या खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन झाले आहे आणि अगदी आपल्या जागेवरून न उठता अनेक गोष्टी होताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना एका दिवसात 1000 पावलेही चालता येत नाही. परंतु ही दीर्घकाळ विश्रांती अत्यंत धोकादायक आहे, यामुळे शरीराला रोग होण्याची शक्यता असते.
फक्त पोटभर खाणे
हेल्दी खाणे आहे की नाही याचा विचार होत नाही
महागाई आणि वेळेअभावी बहुतांश लोक पोट भरण्यासाठीच अन्न खातात. दुसरीकडे, फास्ट फूड, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या वाढत्या संस्कृतीमुळे आरोग्यदायी पदार्थ माणसाच्या आहारातून हळूहळू नाहीसे होत आहेत. अशा परिस्थितीत अस्वच्छ अन्नामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब यांसारखे आजार झपाट्याने वाढत आहेत.
हेदेखील वाचा – Chanakya Niti : पुरुषांच्या ‘या’ सवयी महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात!
वाढता स्क्रिन टाईम
सतत लॅपटॉप मोबाईलवर राहणे
आपण तंत्रज्ञानाने सध्या इतके वेढलेले आहोत की, मोबाईल, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांचा थकवा, झोप कमी होणे आणि मानसिक ताण वाढतो. याव्यतिरिक्त, जास्त वेळ बसल्याने शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो आहे.
तणावाकडे दुर्लक्ष
वाढत्या तणावामुळे होतोय परिणाम
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा तणावाकडे दुर्लक्ष करतो. परंतु दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने हार्मोनल असंतुलन, हृदयविकार आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. याकडे हल्ली जास्तीत जास्त दुर्लक्ष होत असल्याचे आणि त्यामुळे मनाप्रमाणेच शरीरावर ताण येत असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – आई वडिलांच्या ‘या’ सवयी मुलांच्या मानसिकतेसाठी धोक्याचे; वेळीच बदल करा
झोपेची कमतरता
अपूर्ण झोपेचा त्रास
रात्री उशिरापर्यंत जागत राहणे हा नवीन ट्रेंड झाला आहे. पण रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि नैराश्य यासारख्या समस्या निर्माण होतात. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळेही स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. मोबाईलचा अतिरिक्त वापर याचे सर्वात मुख्य कारण आहे आणि याशिवाय ताणतणाव आणि इतर गोष्टींमुळेही झोपेची कमतरता दिसून येत आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.