आचार्य चाणक्यांनी आपल्या नितीशास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींविषयी भाष्य केले आहे. यात त्यांनी जीवन जगण्याचे काही सरळ, सोपो मार्ग सांगितले आहेत. यात मानवाचा स्वभाव आणि गुणांविषयीही भाष्य करण्यात आले आहे.
Chanakya Niti : पुरुषांच्या 'या' सवयी महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात!
आपल्या नितीशास्त्रात आचार्य चाणक्यांनी पुरुषांच्या काही सवयींविषयी सांगितले आहे. पुरुषांमधील या सवयी महिलांना त्यांच्याकडे अधिक आकर्षित करतात
त्यांनी सांगितले की, जे माणसं शांत आणि स्थिर असतात, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाक सुधारणा होते. अशा व्यक्तींना समाजात मान मिळतो आणि महिलाही अशा पुरुषांकडे आकर्षित होतात
चाणक्यांच्या मते, जो पुरुष मनुष्य बळावर अवलंबून राहत नाही आणि आपले ध्येय साधण्यासाठी कठोर परिश्रम करतो, त्याला जीवनात नक्कीच यश मिळते. असे पुरुष महिलांना आकर्षित करतात
अनेकजण असे असतात ज्यांना इतरांचं काही ऐकायचं नसतं त्यांना फक्त स्वत:चे मत मांडायचे असते. ज्या माणसांमध्ये इतरांना ऐकण्याची आणि समजूण घेण्याची क्षमता असते ते सर्वांचेच लाडके असातात. महिलांना अशी माणसं फार आवडतात
प्रत्येक महिलेला असे वाटते की, ती ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहे, त्या व्यक्तीने तिचा कधीही विश्वासघात करु नये. चाणक्यांच्या मते, पुरुषांमध्ये निष्ठेचा गुण असणे अत्यंत आवश्यक आहे
महिलांना असे पुरुष आवडतात जे प्रत्येकाला समान वागणूक देतात आणि जे कधीही कोणता भेदभाव करत नाहीत आणि प्रत्येकाचा आदर करतात. तुमचे असे वागणे असेल तर तुम्हाला सामाजिक स्तरावरही प्रसिद्धी मिळते