फोटो सौजन्य - Social Media
मानसिक परिणाम हे सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतं. लहान मुलांच्या मेंदूवर त्यांच्या संगतीचा तसेच सभोवतालच्या गोष्टीचा लवकर परिणाम होतो. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार करायचे असल्यास फक्त बोलून आणि शिकवून होतं नाही. आई वडिलांच्या सवयीदेखील मुलांना खूप काही शिकवून जातात. या सवयी चांगल्या असल्या तर ठीक, अन्यथा याचे लहान मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतं असतात. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे मानसिक आरोग्य सहदेव निरोगी ठेवायचे आहे तर आजपासून तुमच्या सवयीत काही मुख्य गोष्टींमध्ये बदल करा.
हे देखील वाचा : नवरात्रीच्या उपवासात साबुदाणे खाण्याऐवजी बनवून पहा चविष्ट भगर पुलाव
तुम्ही तुमच्या मुलांना आनंद देण्यासाठी भले अनेक प्रयत्न करत असाल पण तुमच्या सवयींमधील काही गोष्टी त्या निरागस मनाला बोचत आहेत, ज्यामुळे ते निरागस मन सहदेव अस्वस्थ असते. परिणामी, या गोष्टीचा परिणाम त्या निरागस बाळाच्या मानसिकतेवर होतो. मानसिकतेवर होणार परिणाम एखाद्याच्या कार्यक्षमतेवर दिसून येतो. जर तुमच्या मुलाचे शाळेमध्ये गुण कमी येत असतील तर याला कदाचित कारणीभूत तुम्हीच असू शकता.
अनेक आई वडील आहेत, जे आपल्या मुलांशी अगदी मित्राप्रमाणे राहत असतात. आपल्या मुलांशी मित्रासारखे बोलणे, खेळणे तसेच बागडणे मुलांसाठी फायद्याचे ठरते. याने त्यांचा मानसिक भार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असतो. लहानग्या वयामध्ये मुलांना जास्त काही बाहेरचा भार नसतो, असतो तो म्हणजे सभोवताल घडणाऱ्या गोष्टींचा. म्ह्णून त्या गोष्टींना ओळखून आई वडिलांनी त्याबद्दल विचार करणे अपेक्षित असते.
हे देखील वाचा : महिलांच्या पायात नेहमी चांदीचे पैंजण का असतात? जाणून घ्या सविस्तर






