5 सवयी ज्या मुलांना कधीही Boyfriend बनू देत नाहीत; प्रेमाच्या शोधात Friendzone मध्ये अडकतात; तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
आजच्या दुनियेत खरं प्रेम शोधणं किंवा मिळवणं फार कठीण होऊन बसलंय! मुलाला मुलगी आवडत असेल तर मुलीला मुलगा आवडत नाही किंवा मुलीला मुलगा आवडत असेल तर त्या मुलाला ती मुलगी आवडत नाही. बऱ्याचदा मनातील भावना मनातच राहतात आणि काहींना तर आपल्या मनातील भावनाही व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं त्यांना इम्प्रेस करण्याचा फार प्रयत्न करतात पण अखेर त्यांच्या या प्रयत्नांनाचं फळ त्यांना फ्रेंडझोनपर्यंत घेऊन जातं. आता तुमच्यासोबतही असं घडत असेल आणि वारंवार तुम्हाला जर फ्रेंडझोन केलं जात असेल तर काही प्रमुख गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत ज्या टाळल्यास तुम्ही फ्रेंडझोन बनण्यापासून स्वतःला वाचवू शकता.
नेहमी उपलब्ध रहा
तुमची आवडती व्यक्ती कधीही जर तुम्हाला मदतीसाठी कॉल किंवा मेसेज करत असेल तर तुम्ही नेहमीच मदत करण्यासाठी तयार असता का? जर हो, तर लक्षात घ्या ही तुमची पहिली चूक आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी आपली उपलब्धी एखाद्याला दाखवता तेव्हा तुम्ही तुमचे महत्त्व कमी करता आणि वेळोवेळी तुम्हाला ग्राह्य घेतले जाते. असे करून तुम्ही तुमचे महत्त्व त्या व्यक्तीच्या मनात कमी करून बसता आणि त्याला वाटत राहते की, तुम्हाला काहीच काम नाही आणि या व्यक्तीच्या अधीर आहात.
अति प्रशंसा करणे
प्रशंसा ही चांगली असते पण त्याचे अतिकारण कधीही नसावे. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं किंवा प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी मुलीची प्रशंसा करणं तुम्हाला फ्रेंडझोनमध्ये अडकवून टाकू शकतं. मुलींना अशी मुलं जास्त आवडतात जी मोकळ्या मानाने आणि ठामपणे आपली मत मांडतात आणि गरज पडल्यास त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगतात ना की खोट्या प्रशंसा करतात. सतत प्रशंसा केल्याने समोरच्या व्यक्तीला ते नाटकी किंवा खोटं वाटू शकते.
मनातील भावना व्यक्त न करणे
तुम्हाला एखादी मुलगी अथवा मुलगा आवडत असेल तर वेळीच तुमच्या भावना मांडायला शिका. तुम्ही वेळेची वाट बघत राहिलात तर वेळ पुढे निघून जाईल आणि तुम्ही मात्र मागे राहून फक्त संधीचा वाट बघत राहाल. वेळ कुणासाठीही थांबत नाही हे लक्षात घ्या आणि योग्य वेळी तुमच्या मनात व्यक्तीविषयी मैत्रीहुन जास्त काहीतरी आहे हे त्या व्यक्तीला सांगा. तुम्ही सतत जर त्या व्यक्तीसोबत मित्र-मैत्रिणीप्रमाणेच वागत राहिलात तर त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना कधीही समजणार नाहीत आणि त्यांच्या मनात तुमच्यासाठी फक्त मित्रत्वाचीच भावना शिल्लक राहील जी तुम्हाला फ्रेंडझोन बनवण्यासाठी पुरेशी आहे.
आत्मविश्वासाची कमी आणि संकोच
जर तुमच्यात आत्मविश्वास कमी असेल आणि तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी संकोचत असाल तर फ्रेंडझोन होण्यासाठी हे एक मोठे कारण आहे. मुलींना आत्मविश्वासू आणि त्यांचे म्हणणे मांडण्यास सक्षम असलेली मुले जास्त पसंत पडतात. जर तुमचाच तुमच्यावर विश्वास नसेल तर दुसरा कोणी तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार? स्वतःला कधीही कमी समजू नका आणि मोकळेपणाने आपल्या मनातील भावना, विचार मांडायला शिका. तुमच्या देहबोलीतून तो आत्मविश्वास दाखवून द्या.
स्वतःकडे लक्ष न देणे
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी तिच्याभोवती घिरट्या घालण्याची गरज नाही, यावेळी तुम्ही स्वतःकडेही पुरेपूर लक्ष द्यायला हवे. आपली स्टाईल, राहणीमान, स्वभाव याला जपा आणि बघा… तुम्ही जर स्वतःला उत्तम बनवलत तर समोरचा स्वतःहूनच तुमच्यावर इम्प्रेस होईल. मुलींना असे लोक आवडतात जे स्वतःची काळजी घेतात, छंद बाळगतात आणि आयुष्यात काहीतरी साध्य करू इच्छितात. जर तुम्ही फक्त इतरांसाठी जगलात तर तुम्ही तुमची ओळख गमवून बसाल.
फ्रेंड झोन म्हणजे काय?
फ्रेंड झोन ही एक अशी नातेसंबंध स्थिती आहे जिथे एका व्यक्तीला त्याच्या मित्रामध्ये प्रेम किंवा लैंगिक रस असतो, पण दुसरा व्यक्ती त्याला फक्त मित्र बनवून ठेवतो.
तुम्ही फ्रेंड झोनमध्ये आहात हे कसे कळेल?
ते तुमच्यासोबतच्या इतर क्रशबद्दल संभाषण करतील, ते तुमच्याशी फ्लर्ट करत नसतील अथवा तुमच्यात फार इंटरेस्ट घेत नसतील तर समजून जा तुम्ही फ्रेंडझोनमध्ये आहात.