(फोटो सौजन्य: istock)
आजकाल अनेकांना युरिक अॅसिडची समस्या जाणवत आहे. युरिक ऍसिड हे एक नैसर्गिकरित्या तयार होणारे रसायन आहे, जे आपल्या शरीरातील पेशींच्या विघटन प्रक्रियेतून तयार होते. प्युरीन नावाचे घटक असलेल्या पदार्थांच्या सेवनाने युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते सांध्यांमध्ये किंवा किडनीच्या जमा होऊन समस्या निर्माण करू शकते. जर तुम्हाला सांध्यामध्ये, विशेषतः पायाच्या बोटात अचानक तीव्र वेदना, सूज येणे, लालसरपणा, किडनी स्टोन, बोटांमध्ये सूज येणे, बोटे वाकवताना वेदना होणे अशी लक्षणे जाणवत असतील, तर हे सांध्यामध्ये युरिक अॅसिड वाढल्याचे लक्षण असू शकते. यामुळे किडनी स्टोन, गाउट किंवा आरोग्याच्या इतर समस्या होण्याचा धोका असतो. अशात वेळीच याच्यावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी करू शकता.
काकडी
काकडी युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करू शकते. काकडी शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते, ही पचायला हलकी असते. काकडीचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त युरिक अॅसिड काढून टाकण्यास मदत करते. काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, ज्यामुळे ते किडनी स्वच्छ करण्यास आणि मूत्रमार्गे युरिक अॅसिड बाहेर टाकण्याचे काम करते. काकडीत प्युरिनचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते युरिक अॅसिड वाढवणारे अन्न नाही.
बार्ली
आयुर्वेदात बार्लीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असे म्हटले जाते आणि ते युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करते असे देखील मानले जाते. जर तुम्हाला गाउटची समस्या जाणवत असेल अथवा शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त असेल किंवा सांधेदुखी असेल तर बार्लीचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्ही यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता. बार्ली शरीरातील अतिरिक्त युरिक अॅसिड आणि विषारी पदार्थ मूत्रमार्गे बाहेर काढण्यास मदत करते. नैसर्गिक शुद्धीकरणासाठी बार्लीचे पाणी पिऊ शकता.
व्हिटॅमिन सी असलेली फळं
व्हिटॅमिन सी हे युरिक अॅसिड कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे शरीरातील अतिरिक्त युरिक अॅसिड लघवीद्वारे काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळा. संत्री, लिंबू, पेरू या फळांचे सेवन करू शकता. यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळे तुमच्या शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढू देणार नाहीत ज्यामुळे निश्चितच याचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. ही फळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.
पाणी
तुमच्याही शरीरात जर युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढत असेल तर यावर पाण्याचे सेवन सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पुरेसे पाणी पिऊन तुम्ही तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करू शकता. पाण्याचे सेवन किडनीला सक्रिय करतात ज्यामुळे शरीरात वाढलेले युरिक अॅसिड लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. यासाठी दररोज किमान २.५-३ लिटर पाण्याचे सेवन करायला हवे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिंबू पाणी करून देखील पिऊ शकता.
काळाकुट्ट तवा अवघ्या २० रुपयांतच काचेसारखा चकाकेल; १० मिनिटांचा उपाय अन् कोणत्या मेहनतीचीही गरज नाही
युरिक अॅसिड म्हणजे काय?
युरिक आम्ल हे शरीरातील प्युरिनच्या विघटनामुळे निर्माण होणारे नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे.
युरिक अॅसिड वाढण्याची लक्षणे कोणती?
अचानक, तीव्र सांधेदुखी, सूज आणि लालसरपणा, बहुतेकदा मोठ्या पायाच्या बोटात (गाउट). मूतखडे, ज्यामुळे पाठीत किंवा बाजूला तीव्र वेदना, लघवी करताना वेदना किंवा लघवीमध्ये रक्त येऊ शकते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.