Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील 50% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावतेय त्वचेची समस्या, कारणं वाचून डोक्याला लावाल हात

१० पैकी ५ रुग्ण त्वचेचा निस्तेजपणा, काळपटपणा आणि मुरुमांच्या तक्रारी करतात ज्याचा संबंध जास्त कामाचे वाढते तास, अनियमित झोपेचे वेळापत्रक आणि कामाशी संबंधित ताण आहे. जाणून घ्या कारणं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 08, 2025 | 03:42 PM
त्वचेच्या समस्या वाढल्या, काय आहेत कारणं (फोटो सौजन्य - iStock)

त्वचेच्या समस्या वाढल्या, काय आहेत कारणं (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • कामाचे वाढते तास, अपुरी झोप, प्रदूषण आणि वाढता ताणतणावामुळे वाढताय त्वचेच्या समस्या
  • मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक व्यक्तींना त्वचेची समस्या 
  • काय सांगतात तज्ज्ञ
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्ग हा बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम करतो त्याचबरोबर कामाचा ठिकाणी वाढता ताणतणाव, सतत एसीमध्ये वावरणे आणि खाण्या-पिण्याच्या अनियमित या साऱ्याचा परिणाम त्यांच्या त्वचेच्या आरोग्यावर होतो. त्वचेवर रॅशेस येणे, कोरडेपणा, पिंपल्स, केस गळणे किंवा त्वचा निस्तेज दिसणे यासारख्या समस्या दिसू लागतात. 

वाढता ताणतणाव हा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाही; तर तो थेट एखाद्याच्या त्वचेवर परिणाम करतो ज्यामुळे त्वचेची जळजळ, त्वचेवरील तेलग्रंथीचे असंतुलन आणि त्वचा निस्तेज होते. शहरातील ५०% कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांची त्वचा निस्तेज, काळपट झाली असून मुरुमं आणि एक्झिमा होण्याची शक्यता वाढली आहे. जीवनशैलीशी संबंधित त्वचेच्या समस्यांसाठी उपचार घेणाऱ्या २५-४५ वयोगटातील कॅार्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या वाढत चालली असून, वेळीच त्वचेची काळजी घेण्याचे आवाहन त्वचाविकार तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

काय आहेत कारणं

सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचे वाढते तास, ताणतणाव हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनावरच नाही तर त्वचेवर देखील परिणाम करतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचेचा निस्तेजपणा आणि मुरुमाची समस्या वाढते, प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होऊन अकाली वृद्धत्व येते, कामाचा वाढता ताण हा हार्मोनल बदलांना कारणीभूत ठरतो ज्यामुळे मुरुमाची समस्या वाढते, वाढत्या स्क्रीन टाइममुळे त्वचेचा कोरडेपणा आणि मेलॅनिनचे प्रमाण वाढते. 

Skin Problems ना म्हणा बायबाय! रोज प्या 5 हेल्दी घरगुती ज्युस, पहा जादुई परिणाम

काय सांगतात तज्ज्ञ?

मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, २५-४५ वयोगटातील ५०% कर्मचारी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. १० पैकी ५ रुग्ण त्वचेचा निस्तेजपणा, काळपटपणा आणि मुरुमांच्या तक्रारी करतात ज्याचा संबंध जास्त कामाचे वाढते तास, अनियमित झोपेचे वेळापत्रक आणि कामाशी संबंधित ताण आहे. दीर्घकालीन तणावाने कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात सोडले जातात, ज्यामुळे त्वचेवरील तेल ग्रंथीचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा अधिक संवेदनशीलहोते. ताणतणावाचे व्यवस्थापन करून आणि नियमित स्किनकेअर दिनचर्या स्वीकारून या समस्या वेळाच रोखता येतात.

कसे टाळता येईल?

तणावामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी एक त्वचा निगा राखण्यासाठी एक विशेष दिनचर्येचे पालन करा, ज्यामध्ये दररोज स्वच्छता राखणे, त्वचेला मॉइश्चरायझ करणे आणि सनस्क्रीन वापरणे, किमान ७ ते ८ तास झोपणे, प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट-समृद्ध सीरमचा वापर करणे, त्वचा हायड्रेटेड राखणे आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करणे, चालणे, मेडिटेशन करणे किंवा दिर्घ श्वास घेणे यासारख्या तणाव व्यवस्थापनाचा सराव करणे, ब्रेकआउट्स कमी करण्यासाठी उशीचे कव्हर, फोन आणि कामाची जागा स्वच्छ ठेवणे समाविष्ट आहे. 

मुंबईच्या कॉर्पोरेट वातावरणात कामाचा ताण वाढत असल्याने, त्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान अधिक सामान्यपणे आढळून येते. जीवनशैलीतील साधे बदल करुन चांगली झोप व तणावाचे व्यवस्थापन करत तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वचेची निगा राखल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते असेही डॉ. शरीफा यांनी स्पष्ट केले.

त्वचा समस्येने त्रस्त 

एम्स रूग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ वैभव कळंबे म्हणाले, २५ ते ४५ वयोगटातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ताणतणाव. अशा स्थिती सध्या अनेक लोक त्वचेच्या समस्येने त्रस्त आहेत. बऱ्याच लोकांना त्वचेचा निस्तेजपणा, वारंवार मुरुमे येणे, खाज सुटणे आणि एक्झिमासारख्या समस्या सतावत आहेत. तसेच कामाचे वाढते तास आणि कमी झोप यामुळे त्वचेचे नैसर्गिक दुरुस्तीचे चक्र बिघडते. नियमित झोप, पुरेसे हायड्रेशन, सनस्क्रीनचा वापर आणि योग्य स्किनकेअर दिनचर्या यासारख्या सोप्या पध्दतींचा अवलंब करुन त्वचेचे संरक्षण करता येते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्किनकेअर उत्पादनांचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.

शरीराच्या या 5 भागात खाज येणे आरोग्यास ठरते घातक, भयंकर आजाराचा इशारा; चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

Web Title: 50 percent of corporate employees in mumbai suffer from skin problems read the reasons you will be shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Skin Care
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार
1

सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन
2

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर
3

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
4

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.