त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे प्रभावी उपाय
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिला स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचा कंटाळा करतात. मात्र योग्य स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करावे. स्किन रुटीनसोबत आहारात बदल करून त्वचेच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेचे गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरतात. मात्र हे महागडे प्रॉडक्ट काहीवेळा त्वचेला सूट न झाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
महिलांच्या शरीरात सतत बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. शरीरात होणारे हार्मोनल असंतुलन, मासिक पाळी, मानसिक शारीरिक समस्या इत्यादी गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी आरोग्यासह त्वचेची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पपईचे सेवन करू नये. पपई खाल्यामुळे त्वचेला आवश्यक असलेले विटामिन सी मिळते. याशिवाय शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि त्वचा सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि सी इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. यासाठी दही आणि पपई मिक्स करून मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण त्वचेवर लावून 10 ते 15 मिनिटं तसेच ठेवून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचे उजळदार आणि सुंदर होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागते. त्वचा काळी झाल्यानंतर ती उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. काही महिला त्वचा उजळ्वण्यासाठी ब्रिटनिंग क्रीमचा वापर करतात. मात्र असे करण्याऐवजी बटाट्याचा रस काढून त्वचेवर आणि डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांवर लावावा. यामुळे काळवंडलेला भाग स्वच्छ होऊन त्वचा उजळदर दिसते. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल युक्त शँम्पू किंवा इतर प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची गुणवत्ता सुधारावी. केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यास खोबऱ्याचे तेल कोमट करून केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करावी. यामुळे केस सुंदर आणि घनदाट होतील.