बद्धकोष्ठतेवरील घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
बद्धकोष्ठता, गॅस बाहेर पडण्यास असमर्थता, पोट सतत फुगणे आणि आतड्यांचे कार्य बिघडणे या सामान्य समस्या बनल्या आहेत. अनेकांना दिवसेंदिवस आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास त्रास होतो. शौचास जाण्यास असमर्थता बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरू शकते आणि जर त्यावर उपचार न केल्यास, मूळव्याध, फिस्टुला आणि फिशर होऊ शकतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी किंवा आतडे साफ करण्यासाठी तुम्हाला औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपायदेखील बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. योग्य आहार, योग्य खाण्याच्या सवयी, पुरेसे पाणी आणि काही नैसर्गिक घटकांचे नियमित सेवन आतड्यांचे कार्य सुधारून बद्धकोष्ठता कमी करू शकते. प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर डॉ. मँडेल यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत, जे पचनसंस्था मजबूत करू शकतात आणि नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठता कमी करू शकतात.
सुंठ आणि ऑलिव्ह ऑईल
सुंठ ठरेल उपयुक्त
सुंठामध्ये फायबर आणि सॉर्बिटॉल असते, जे आतड्यांमध्ये पाणी ओढतात आणि मल अर्थात शौच मऊ होण्यास मदत करतात. २-३ सुंठ रात्रभर कोमट पाण्यात भिजवा. सकाळी पाणी प्या आणि सुंठाचे सेवन करा. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता लवकर दूर होते. त्याचप्रमाणे, सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा ऑलिव्ह ऑइल घ्या. चवीसाठी तुम्ही थोडासा लिंबाचा रस घालू शकता. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते आणि आतड्यांचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
लिंबू आणि गरम पाणी
लिंबू घातलेले गरम पाणी प्या
अर्धे लिंबू एक कप गरम पाण्यात तुम्ही सकाळी उठल्यानंतर पिळून घ्या आणि हे पाणी हळूहळू प्या. लिंबामधील सायट्रिक अॅसिड पचनक्रिया उत्तेजित करते आणि कोलनमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ आणि अपचन शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते. यामुळे बद्धकोष्ठता समस्या होत नाही आणि शौचाला नियमित होते
आळशीच्या बिया
आळशीच्या बियांचे सेवन
आळशी हे बद्धकोष्ठतेवरील उत्तम आणि रामबाण औषध आहे. आळशीचे तेल हे आतड्यांना सहजपणे वंगण घालते आणि पोटात सडलेला वा चिकटलेला शौच त्वरीत बाहेर येण्यास मदत मिळते. तुम्ही आळशीच्या बिया नियमित भिजवून खाऊ शकता. याचा तुम्हाला फायदा मिळेल.
कोरफडचा उपयोग
बद्धकोष्ठतेसाठी कोरफड
तुम्ही थेट वनस्पतीपासून बनवलेले कोरफडीचे जेल घेऊ शकता किंवा व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या कोरफडीच्या रसाचा वापर करू शकता. ते शौच मऊ करण्यासाठी, नियमिततेला चालना देण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी प्रभावी आहे. त्यात अँथ्राक्विनोन्स नावाचे संयुगे असतात, जे आतड्यांचे कार्य उत्तेजित करतात आणि आतड्यांतील पाण्याचे प्रमाण वाढवतात. सकाळी रिकाम्या पोटी २-३ चमचे कोरफडीचा रस समान प्रमाणात पाण्यात मिसळून प्या.
एप्सन सॉल्ट आणि बेकिंग सोडा
मीठ आणि सोड्याचे समीकरण
एप्सन सॉल्टमध्ये मॅग्नेशियम असते, जे आतड्यांचे स्नायू आकुंचन पावते. १ कप पाण्यात किंवा रसात २ चमचे एप्सन सॉल्ट विरघळवून प्या. हे आतड्यांमध्ये पाणी ओढून मल मऊ करते. त्याचप्रमाणे, बेकिंग सोडा पोटातील आम्ल संतुलित करतो आणि मल बाहेर पडण्यास मदत करतो. १/४ कप कोमट पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा विरघळवून प्या.
कॉफी आणि डँडेलियन टी
डँडेलियन टी चा करा वापर
सकाळी कॉफी पिण्याने पचनसंस्थेला चालना मिळते. जास्त कॉफी रपिण्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते हे लक्षात ठेवा, म्हणून भरपूर पाणी प्या. त्याचप्रमाणे, डँडेलियन चहा सौम्य रेचक म्हणून काम करते. दिवसातून तीन कपपर्यंत तुम्ही डँडेलियन टी प्या. यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होऊ शकते.
पहा तज्ज्ञांचा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.