बद्धकोष्ठता आणि फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? हावर्ड डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' पदार्थांचे करा सेवन
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जंक फूड खाण्याची खूप जास्त सवय असते. आहारात सतत बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. यासोबतच एनर्जी ड्रिंक्स, सोडा किंवा शेक्स इत्यादी पेय प्यायली जातात. या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीर काहीकाळ फ्रेश राहते. पण वारंवार या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे आहारात सात्विक आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पोटामध्ये अत्याधुनिक औषधे, महागड्या डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ 1 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येऊ शकतो Heart Attack, वेळीच सावध व्हा!
सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात विषारी घटक साचून राहतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता आणि फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हावर्ड डॉक्टरांनी सांगितलेल्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी स्वयंपाक घरातील या पदार्थांचे नियमित सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय पोटात वाढलेला जडपणा, गॅस, मळमळ किंवा उलट्या होत असल्यास आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे पोटातील पचनाची प्रक्रिया सुधारते. याशिवाय पोटात साचून राहिलेले पित्त बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
बऱ्याचदा आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते. याशिवाय कोणताही पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. अशावेळी पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. यासोबतच आतड्या स्वच्छ होतात. पुदिन्याच्या तेलातील नैसर्गिक गुणधर्म स्नायू शिथिल करतात. पुदिन्याचा चहा किंवा पुदिन्याच्या पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जातील.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन केले जाते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते. याशिवाय नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळेल.
पचनाच्या सामान्य समस्या आणि कारणे:
फायबरची कमतरता, पुरेसे पाणी न पिणे आणि कमी हालचाल ही सामान्य कारणे आहेत. प्रक्रिया केलेले अन्न, चरबीयुक्त पदार्थ आणि काही लोकांमध्ये ग्लूटेन किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे हे होऊ शकते.
पचन सुधारण्यासाठी उपाय:
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगदाणे आणि बिया फायबरचे चांगले स्रोत आहेत, जे आतड्यांची हालचाल नियमित ठेवण्यास मदत करतात.
जीवनशैलीत बदल:
ध्यान, योगा किंवा इतर मार्गांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. नियमित शारीरिक हालचाल पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. पुरेशी झोप शरीराला ताजेतवाने करते आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.