कॅल्शियम वाढविण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
तुम्हाला एका विशिष्ट वयानंतर शरीरात नक्कीच कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते. कॅल्शियम कमी झाले की हाडं ठिसूळ होतात आणि हाडांच्या आणि दातांच्या समस्या जाणवू लागतात. यामुळे हाडं कमकुवत होणे, सतत हाडांचे फ्रॅक्चर होणे, पाठ आणि गुडघ्यात दुखणे, हाडांचा योग्य विकास न होणे, दातांमध्ये कमकुवतपणा येऊन दुखणे असे त्रास उद्भवतात.
कॅल्शियम हे शरीरातील एक महत्त्वाचे खनिज आहे जे दातांना आणि हाडांना मजबूत करते आणि याशिवाय हृदय, मांसपेशी आणि नर्व्हस सिस्टिमला योग्य काम करण्यास मदत करते. पण जेव्हा कॅल्शियमचे प्रमाण कमी होते तेव्हा अनेक शारीरिक आणि मानसिक परिणाम दिसून येतात. हे लक्षण हळूहळू विकसित होतात आणि योग्य वेळी लक्ष न दिल्यास त्याचा परिणाम गंभीर आजारात बदलतो.
कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी अनेकदा दूध, दही वा पनीरसारखे दुधाचे पदार्थ खाणे योग्य मानले जाते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहेतच. पण तुम्हाला माहीत आहे का? न्यूट्रिशन कोच रयान फर्नांडो यांनी यापेक्षा काही वेगळे पदार्थही आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला सांगितले आहेत आणि ते कोणते पदार्थ आहेत, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
कोणते आहेत कॅल्शियम रिच फूड्स?
शेवग्याच्या शेंग्याची पावडर
मोरिंगा पावडरचा करा वापर
१०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगांची अर्थात मोरिंगा पावडरमध्ये सुमारे २६६७ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. हे प्रमाण दुधापेक्षा सुमारे १७ पट जास्त आहे. तुम्ही दिवसातून एकदा कोमट पाण्यात, दूधात किंवा स्मूदीमध्ये १ चमचा अर्थात साधारण ५ ग्रॅम मोरिंगा पावडर मिसळून घेऊ शकता. ही पावडर हाडे मजबूत करते, ऑस्टियोपोरोसिस प्रतिबंधित करते, सांधेदुखीपासून आराम देते.
डाएटमध्ये समाविष्ट करा 5 कॅल्शियम रिच फूड्स, हाडं आणि दातांमध्ये भरेल मजबूती
अळूची पाने ठरतील फायदेशीर
१०० ग्रॅम शिजवलेल्या अळूमध्ये सुमारे १५४६ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. जर अळूची भाजी नियमितपणे खाल्ली तर ती हाडांच्या आरोग्यासाठी मदत करू शकते. अळूची भाजी हाडे मजबूत करते, पचन सुधारते आणि हृदय निरोगी ठेवते. अळू पूर्णपणे शिजवल्यानंतरच खावी. त्यात खनिजे असतात, जे हाडांसाठी आणि पचनासाठी एक चांगला पर्याय असल्याचे मानले जाते.
खजुराचा गूळ
खजुराच्या गुळाचा करून घ्या फायदा
१०० ग्रॅम खजूराच्या गुळामध्ये १२५२ मिलीग्राम कॅल्शियम असते. ते खजूराच्या अर्कापासून मिळणारे गोड पदार्थ आहे. त्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे देखील आढळतात. पांढऱ्या साखरेऐवजी निरोगी पर्याय म्हणून याचा वापर करता येतो. गूळ हा जेवणात वापरायचा चांगला पर्याय आहे आणि आरोग्यासाठीही उत्तम ठरतो
सफेद तीळ उत्तम पर्याय
नियमित सफेद तीळ खा
१०० ग्रॅम तिळात सुमारे १२८३ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. हे प्रमाण खूप जास्त आहे आणि तीळ कॅल्शियमचा एक उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत मानला जातो. विशेषतः जर तीळ भाजले किंवा हलके भिजवले तर ते शरीराद्वारे चांगले शोषले जाऊ शकते.
उच्च कॅल्शियम साहित्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हिवाळ्यात तिळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की किंवा भाजलेल्या तीळासोबत गूळ खाणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही दररोज सॅलड किंवा भाज्यांमध्ये १-२ चमचे तीळ घालू शकता.
चिया सीड्स
चिया सीड्सचा फायदा
१०० ग्रॅम चिया सीड्समध्ये सुमारे ६३१ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. ही मात्रा तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेच्या सुमारे ६३% पूर्ण करू शकते. चिया सीड्सचे सेवन कसे करायचे असा प्रश्न असेल तर तुम्ही १-२ चमचे एका ग्लास पाण्यात किंवा दुधात रात्रभर भिजवून, ते स्मूदी, ओट्स किंवा दह्यात मिसळून किंवा चिया पुडिंगच्या स्वरूपात खावे
शरीरातील कॅल्शियम खेचून काढतात हे घातक पदार्थ, उरतो फक्त हाडांचा सापळा, त्वरित सेवन टाळा
कडिपत्त्याचे सेवन
कडिपत्ता ठरेल उत्तम
१०० ग्रॅम कढीपत्त्यामध्ये सुमारे ६५९ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. हाडे मजबूत करण्यासाठी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहे. ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे. तुम्ही पाने भाज्यांमध्ये मसाला घालून, कोरडी पावडर बनवून आणि दही किंवा ताकात मिसळून, कढीपत्त्याचा काढा बनवून किंवा स्मूदी किंवा चटणीमध्ये मिसळून सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.