Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिमद्यपानामुळे 60% तरुणांना भविष्यात AVN चा धोका, अपुरा रक्तपुरवठ्यामुळे मरतील हाडांच्या उती

प्रौढांमध्ये AVN प्रकरणांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २५ ते ३५ वयोगटातील ६०% तरुणांना अतिमद्यपानामुळे वयाच्या पन्नाशीतच अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होण्याची शक्यता वाढते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 18, 2025 | 11:10 AM
अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय, काय होतो परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय, काय होतो परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच ऑस्टिओ नेक्रोसिस. यामध्ये हिप्सच्या जॉईंटना रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत पावतात. तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत. अति मद्यपानाच्या सवयींमुळे ६०% तरुणांना उतारवयात अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN)चा धोका असतो. 

मद्यपान हे ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे प्रमुख कारण ठरत असून त्यांना प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात. हे हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात, परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो.

काय सांगतात तज्ज्ञ

पुण्यातील जहांगिर मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले की, महिनाभरात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांपैकी अति मद्यपान करणाऱ्या ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे १० पैकी ५ व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसची समस्या आढळून येते. अशा रुग्णांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. प्रौढांमध्ये एव्हीएनच्या प्रकरणांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, २५ ते ३५ वयोगटातील ६०% तरुणांना अति मद्यपानामुळे त्यांच्या वयाच्या पन्नाशीतच अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होण्याची शक्यता वाढते. 

दही खाण्यामुळे आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो? वैज्ञानिकांनी 1.5 लाख लोकांवर झाला रिसर्च, Result Positive

काय आहे प्रमुख कारण 

अतिमद्यपान हे नितंबाच्या अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे एक प्रमुख कारण ठरते आहे. अव्हॅस्कुलर नेक्रोसिस ही अशी स्थिती आहे जिथे रक्तपुरवठ्याअभावी हाडांच्या ऊती मरतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडे ठिसूळ होतात आणि तुटतात . मद्यपान आणि स्टिरॉइडचा वापर हा ६५% पेक्षा व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिससारख्या समस्येस कारणीभूत ठरतो. अल्कोहोलच्या सेवनाने अव्हॅस्कुलर नेक्रोसिस झालेले बहुतेक रुग्ण सहसा ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. 

कसा वाढतो धोका?

साधारणपणे ८ ते १० वर्षे सलग अल्कोहोलचे सेवन करत असल्यास आठवड्यातून ४०० मिली किंवा त्याहून अधिक मद्य आपल्या शरीरात जाते. मद्यपानामुळे सीरम ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉलची पातळी तसेच अस्थिमज्जामध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचा धोका इतर घटकांवर देखील अवलंबून असतो,जसे की तंबाखूचा वापर, जुनाट आजार आणि अनुवांशिकता. मद्यपानामुळे ऑस्टिओनेक्रोसिसचा धोका वाढते. याची लक्षणे म्हणजे कंबरदुखी, स्नायुंमधील कडकपणा आणि स्नायुंच्या हलचालींवर येणाऱ्या मर्यादा. या रुग्णाप्रमाणेच, नितंबाचे हाड मोडलेल्या रुग्णांवर टोटल हिप रिप्लेसमेंटने उपचार केले जातात.

तरूणांमध्ये वाढतंय प्रमाण 

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजन कोठारी म्हणाले की, तरुणांमध्ये हिपच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत कारण अनेकांना अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे (AVN) निदान होत आहे. त्यामागची कारणे म्हणजे स्टिरॉइड्सचा गैरवापर, हाड मोडणे, नितंबाचे हाड मोडणे, रेडिएशन थेरपी, अति मद्यपान अशी आहेत. अल्कोहोलचे सेवन आणि अव्हॅस्कुलर नेक्रोसिस यांच्यात परस्परसंबंध आहे. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन हा अव्हॅस्कुलर नेक्रोसिससाठी एक जोखीम घटक आहे, कारण तो हाडांमधील रक्त प्रवाह बिघडवतो, ज्यामुळे हाडांमधील पेशींचा मृत्यू होतो. त्याच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा यांचा समावेश आहे. 

15 वर्ष मेंदूवर रिसर्च, तल्लख होण्यासाठी डॉक्टरने सांगितले काय खावे; मुलांचा मेंदू धावेल १०० च्या वेगाने

कोणत्या वयोगटाला त्रास 

दरमहा, अंदाजे, २५ ते ३५ आणि त्याहून अधिक वयोगटातील १० पैकी ३ लोकांना अति मद्यपानामुळे  अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो. जास्त मद्यपान केल्यामुळे जीवनमान सुधारण्यासाठी हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता असलेल्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसच्या प्रकरणांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 23 ते 30 वयोगटातील सुमारे 45% तरुणांना भविष्यात अव्हॅस्कुलर नेक्रोसिस चा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास, अव्हॅस्कुलर नेक्रोसिसमुळे सांध्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हिप रिप्लेसमेंट प्रक्रियेची आवश्यकता भासते.

काय आहेत पर्याय

डॉ. अरबट पुढे सांगतात की, रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, गतिशीलता आणि शारीरीक हालचालींमध्ये सुधारणा आणण्यासाठी हिप रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय आहे. जेव्हा शारीरिक उपचार, वेदनाशामक औषधे किंवा चालताना आधार घेण्यासारख्या उपचारांमुळे आराम मिळत नाही तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. सध्या, सुपरपॅथ हिप रिप्लेसमेंट ही अव्हॅस्कुलर नेक्रोसिसशी झुंजणाऱ्यांसाठी एक प्रभावी तंत्र ठरत आहे. 

हे एक कमीत कमी आक्रमक टोटल हिप रिप्लेसमेंट तंत्र आहे ज्यामध्ये एक लहान छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते, यामध्ये चीरफाड न केल्याने जवळचे स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान होत नाही. यामुळे बरे होण्याचा कालावधी आणि रुग्णालयातून घरी जाण्याचा कालावधी कमी होतो, कमीत कमी रक्तस्त्राव होतो आणि यशस्वी परिणाम मिळतात. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही त्रासाशिवाय किंवा नितंबाच्या वेदनेशिवाय चालू शकतात. रुग्ण कोणत्याही आव्हानांशिवाय त्यांच्या दैनंदिन कामांना पुन्हा सुरूवात करू शकतो.

Web Title: 60 percent of young people are at risk of avn in the future due to excessive alcohol consumption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Alcohol
  • Health Care Tips
  • Health News

संबंधित बातम्या

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
1

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
2

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
3

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
4

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.