
मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनने एक अतिमहत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करून मधुमेह आणि लठ्ठपणाबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना “लठ्ठपणा आणि मधुमेहाशी लढा देण्याच्या दिशेने पुढचे पाऊल” अशी होती आणि प्रतिबंधात्मक काळजी व जीवनशैली संबंधित हस्तक्षेपाची तातडीची गरज त्यातून स्पष्ट करण्यात आली. या कार्यक्रमात आघाडीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन अशा 14 प्रतिज्ञा घेतल्या, ज्यांत चयापचय आरोग्य सुधारण्याचे आणि रूग्णांना शक्ती प्रदान करण्याचे उद्देश ठेवले होते.
मधुमेहग्रस्त लोकसंख्येतली एक मोठी संख्या भारतात राहते आणि त्यात 100 मिलियनहून अधिक लोकं हा आजार सहन करून जगत आहेत आणि सुमारे 136 मिलियन लोकांना मुधुमेह-पूर्वीचा धोका आहे[ 13410_2025_1488_Article.indd]. जागतिक पातळीवर, 2024 साली जगातील प्रौढ लोकसंख्येच्या 11.1%, म्हणजेच 589 मिलियन प्रौढ जीव (वय 20-79 वर्षे) मधुमेह सहन करून जगत होते. 2050 पर्यंत, ही संख्या 853 मिलियन (13%) पर्यंत वाढण्याचा अंदाज बांधला जात असून यामुळे जागतिक पातळीवर 45% वाढ चिन्हांकित केली जाणार आहे.
लठ्ठपणा, जो मधुमेहाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतो, धोकादायक दराने वाढत आहे कारण लोकांची जीवनशैली आता बसून राहण्याजोगी झालेली आहे आणि त्यांच्या आहाराच्या सवयी खराब झाल्या आहेत. हा दुहेरी महामारीचा आजार सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असून त्यायोगे प्रतिबंध, लवकर तपासणी आणि समग्र काळजी यामध्ये नेतृत्व करणे आरोग्य सेवा व्यावसायिकांना गरजेचे झालेले आहे, अशी माहिती अहमदाबाद येथील डायकेअर-डायबिटीज केअर अँड हार्मोन क्लिनिकचे अध्यक्ष आणि मुख्य मधुमेह तज्ञ डॉ. बंशी साबू यांनी दिली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, डॉक्टरांनी जुनाट आजार म्हणून लठ्ठपणावर उपचार करणे, शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे, यकृत आणि मुख आरोग्य सुधारणे, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि भारताला चयापचय उत्कृष्टतेत जागतिक नेता बनविणे सामील असलेल्या 14 प्रतिज्ञांबाबत बांधिलकी दर्शवली.
डॉ. मनोज चावला, संचालक आणि सल्लागार मधुमेह तज्ञ, लीना डायबिटीज केअर आणि मुंबई डायबिटीज रिसर्च सेंटर म्हणाले: “मधुमेह आणि लठ्ठपणा वेगळ्या अवस्था नसून प्रगत चयापचय आजारास कारणीभूत ठरणारे सखोल प्रेरक आहेत. भारतीय लोकसंख्येची विशिष्ट अनुवांशिक प्रवृत्ती लक्षात घेतली, तर या लोकसंख्येला मधुमेहाशी संबंधित गंभीर जटिल अवस्था होण्याचा धोका वाढून त्यात वेगाने वाढणारा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, नेफ्रोपॅथी आणि फॅटी लिव्हर डिसीझ सामील आहेत. ”
डॉ. पूर्वी चावला, सल्लागार मधुमेह तज्ञ, लीना डायबेटिस केअर सेंटर म्हणाल्या: “अनेक दशकांपासून, जीवनशैलीतील बदलांपासून (आहार आणि व्यायाम) आक्रमक शस्त्रक्रिया हस्तक्षेपांपर्यंत, असे वजन कमी करण्याचे मर्यादित पर्याय लठ्ठपणा आणि मधुमेहावर उपचार करणाऱ्या व्यक्तींसमोर होते. आज, एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन बदल घडून आला आहे ज्यास सेमग्लुटाइड सारख्या औषधोपचाराच्या वापरावर वाढत्या चिकित्सालयीन एकमताने चिन्हांकित केले गेले आहे. लठ्ठपण कमी करणे आणि टिकवणे या बाबतीत मधुमेह असलेल्या अनेक लोकांना येणाऱ्या अडचणींची व्यवस्थित नोंद ठेवली गेली असल्यामुळे ही प्रगती विशेष स्वरूपात महत्त्वपूर्ण ठरते.”
डॉ. राकेश पारेख, आगामी महासचिव, आरएसएसडीआय, यांनी पुढील गोष्टीचे महत्व सांगितले : “जीवनशैलीत बदल मधुमेह प्रतिबंध आणि लठ्ठपणा व्यवस्थापनाचा आधारस्तंभ असले तरीसुद्धा आम्ही चिकित्सक म्हणून एकत्र येऊन भारतीय लोकसंख्येसाठी अनुकूल असा बहुआयामी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. असाधारण चयापचय संबंधी आव्हाने, जसे की अभिभावी अशा ‘थिन-फॅट फेनोटाइप’ प्रकारातून वारंवार उद्भवणाऱ्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीझ (एनएएफएलडी), यांवर उपचार करण्यासाठी ही रणनीती अतिशय महत्वपूर्ण आहे.”
लठ्ठपणा आणि मधुमेहाशी लढण्यासाठी वैद्यकीय समुदायाला एकत्र आणण्याच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वाची पायरी दर्शवतो. या प्रतिज्ञांद्वारे, डॉक्टर प्रतिबंध आणि शिक्षण हे आरोगयदायी भविष्यासाठी अगदी महत्वाचे असल्याचे एक शक्तिशाली उदाहरण घालून देत आहेत आणि तो संदेश बळकट करीत आहेत. चयापचय उत्कृष्टतेत भारताने जागतिक पातळीवर या कार्याचे नेतृत्व करण्याचे उद्देश मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनने ठेवलेले असून त्या दृष्टीकोनाच्या दिशेने या उपक्रमाद्वारे पुढचे पाऊल उचलले जात आहे.
Ans: मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
Ans: अति तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणे
Ans: ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे.